Dombivli MIDC Blast : डोंबिवलीतील स्फोट झालेल्या कारखान्याबाबत धक्कादायक माहिती समोर; मंत्री सामंतांची मोठी घोषणा!

Dombivli MIDC News : डोंबिवलीतील स्फोट झालेल्या अमुदान केमिकल कंपनीतील बॉयलरला परवानगी नव्हती. अनधिकृतपणे बॉयलर चालवला जात होता. एका पाठोपाठ एक, तीन मोठे स्फोट झाले. स्फोटानंतर बॉयलरचे तुकडे लांबपर्यंत उडून पडले होते.
Uday Samant
Uday SamantSarkarnama

Thane News : ठाणेच्या डोंबिवलीत केमिकल्स कंपनीतील (Dombivli MIDC blast) स्फोटानंतर कामगार विभागाकडून या कंपनीबाबत मोठी माहिती समोर आली. स्फोट झालेल्या अमुदान केमिकल्स कंपनीत बॉयलरसाठी परवानगी घेण्यात आली नव्हती. कंपनीतील बॉयलर अनधिकृत होता. या स्फोटाची संपूर्ण चौकशी होणार, असल्याची घोषणा उद्योग मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी केली.

डोंबिवली येथील एमआयडीसीतील अनुदान केमिकल कंपनीत गुरूवारी दुपारी मोठा स्फोट झाला. एका पाठोपाठ एक, तीन मोठे स्फोट झाले. या स्फोटानंतर कंपनीत (Company) आग वेगाने पसरली. या आगीत कंपनीतील 8 पेक्षा जास्त कामगारांचा होरपळून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. 50 कामगार जखमी झाले आहे. या स्फोटांची तीव्रता एवढी होती की, चार किलोमीटरपर्यंत स्फोटाचे (Blast) आवाज गेले. आजूबाजूच्या एक ते दीड किलोमीटरपर्यंतच्या इमारतींना हादरे बसले. इमारती आणि घरांच्या काचा फुटल्या. डोंबिवलीच्या स्फोटाची राज्य सरकारने दखल घेत तातडीने मदतकार्य सुरू केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मदत कार्यालयाच आढावा घेतला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Uday Samant
CM Eknath Shinde News : उद्योग राज्याबाहेर गेले म्हणणाऱ्या दानवेंना मुख्यमंत्री शिंदेंचा टोला, 'आरोप करायला...'

या अमुदान केमिकल कंपनीतील बॉयलरला परवानगी नव्हती. अनधिकृतपणे बॉयलर (Unauthorized Boiler) चालवला जात होता. स्फोटानंतर बॉयलरचे तुकडे लांबपर्यंत उडून पडले होते. कामगार विभागाकडून देखील या कंपनीतील बॉयलरला परवानगी नसल्याची माहिती समोर आली. त्यामुळे अनधिकृत बॉयलर सुरू झालाच कसा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. कंपनीतील अनधिकृत बॉयलर परवानगी न घेता सुरू करण्यामागे मोठे बळ असल्याची चर्चा आहे. According to the information of the labor department the boiler of the company that exploded in Dombivli was not allowed

या बॉयलरमध्ये तीन स्फोट झाले. स्फोटानंतर कंपनी आणि आजूबाजूच्या परिसरात आग पसरली होती. ही आग नियंत्रण आणण्यासाठी अग्नीशमन दल काम करत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्फोटाची माहिती घेऊन प्राथमिक मदतकार्य व्यवस्थित सुरू आहे का, याचा आढावा घेतला. उद्योग मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी अमुदान कंपनीला भेट देऊन घटनेची माहिती दिली. मदतकार्याचा आढावा घेतला. तसेच या स्फोटाची संपूर्ण चौकशी होईल असे सांगून, दुर्घटनेत जखमी झालेल्या कामगारांच्या उपचाराचा खर्च सरकारतर्फे करण्यात येणार असल्याची घोषणा मंत्री उदय सामंत यांनी केली.

Uday Samant
Eknath Shinde : 'मराठवाड्यातील पाणीपातळी वाढवण्यासाठी 'NGO'ची मदत घेणार' ; मुख्यमंत्री शिंदेंचा निर्णय!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com