Thane District Politics : ठाणे जिल्हा विभाजनाचे 'कल्याण' होणार? चेंडू मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात

CM Eknath Shinde will decide on Division : निवडणुकीच्या तोंडावर पालकमंत्री शंभूराज देसाईंची सावध भूमिका
Shambhuraj Desai, Eknath Shinde
Shambhuraj Desai, Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

पंकज रोडेकर

Thane News : लोकसभा निवडणुकीची (Loksabha Election) रणधुमाळी सुरू असतानाच ठाणे जिल्हा विभाजनाची मागणी जोर धरू लागली आहे. ठाणे जिल्ह्याचं विभाजन करून कल्याण वेगळा जिल्हा करा, अशी मागणी खुद्द भाजपकडूनच (BJP) केली जात आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी सावध भूमिका घेतली आहे.

ठाणे जिल्ह्याचं विभाजन करून कल्याण (Kalyan) जिल्ह्याची निर्मिती करा, ही मागणी जुनीच आहे. ठाणे जिल्हा हा आशिया खंडातील सर्वात मोठा जिल्हा म्हणून ओळखला जायचा. त्यामुळे प्रशासकीय काम सोपे व्हावे, म्हणून ठाणे जिल्ह्याच्या विभाजनाची मागणी होत होती. अखेर 1 ऑगस्ट 2014 रोजी ठाण्याचे विभाजन होऊन नवा पालघर जिल्हा जन्माला आला. त्यावेळीही कल्याण जिल्हा निर्माण करण्याची मागणी होत होती.

Shambhuraj Desai, Eknath Shinde
Kalyan Politics : कल्याण जिल्हा होणार? भाजप आमदाराच्या मागणीवर श्रीकांत शिंदे बोलले

आता लोकसभा आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकांचा पडघम वाजत असतानाच भाजपकडून ठाणे जिल्ह्याच्या विभाजनाची मागणी होत आहे, हे विशेष. या मागणीवर पालकमंत्री शंभूराज देसाई काही बोलायला तयार नाहीत. त्यांनी जिल्हा विभाजनाचा निर्णय वरिष्ठ पातळीवर चर्चा करून घेतला जाईल, असं सांगत चेंडू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या कोर्टात ढकलला आहे.

कल्याण ते थेट कर्जतपर्यंत कल्याण जिल्हा असावा, अशी मागणी होत आहे. वास्तविक कर्जत हे रायगड जिल्ह्यात येते. पण प्रशासकीय कामांसाठी कर्जतमधील लोकांना अलिबागला जावे लागते. हा खूप लांबचा फेरा आहे. त्याऐवजी त्यांना कल्याण जिल्ह्यात समाविष्ट करून घेतल्यास त्यांना सोयीचे जाईल, असा युक्तिवाद केला जात आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

याशिवाय कल्याणमध्ये मुंबई विद्यापीठाचे उपकेंद्र आहे, न्यायालय आहे. बाजारपेठ असून कृषी उत्पन्न बाजार समितीदेखील या ठिकाणी आहे. त्यातही दळणवळणाची रेल्वेसह इतर साधनेदेखील उपलब्ध आहेत. त्यामुळे कल्याण जिल्हा होण्यात अडचणी येणार नाहीत, असेही सांगितले जात आहे.

गेल्या काही वर्षांत येथील लोकसंख्या वाढली आहे. सोयी-सुविधांवर प्रचंड ताण पडू लागला आहे. त्यामुळे पालघर जिल्ह्याप्रमाणे कल्याण जिल्हा करण्यात यावा, अशी मागणी लावून धरण्यात येत आहे. सोमवारी झालेल्या ठाणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीतदेखील भाजपचे आमदार किसन कथोरे (Kisan Kathore) यांनी याचीच री ओढली. त्यासंदर्भातील ठरावदेखील याच बैठकीत करण्यात यावा, असे त्यांनी म्हटले.

Shambhuraj Desai, Eknath Shinde
Uddhav Thackeray : एकनाथ शिंदेंना मात देण्यासाठी ठाकरे पिता-पुत्राचे ठाणे-कल्याणमध्ये 'ठाण'

दरम्यान ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी सर्वपक्षीय आमदारांशी चर्चा करून, वरिष्ठ नेतेमंडळी आणि मुख्यमंत्री, तसेच दोन उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून मग त्यावर योग्य निर्णय घेता येईल, असे सांगून ठाणे जिल्हा विभाजनाचा मुद्दा मुख्यमंत्र्यांच्या दिशेने फेटाळून लावला आहे. मुख्यमंत्री शिंदे ठाण्याचे आहेत, तर त्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे हे कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत.

आधीच कल्याण लोकसभा मतदारसंघावर भाजपची नजर आहे. त्यातच आता भाजपकडूनच ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून कल्याण जिल्ह्याच्या निर्मितीची मागणी होत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री याबाबत काय विचार करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिवाय लोकसभा, तसेच विधानसभा निवडणुकीतही कळीचा मुद्दा ठरू शकतो, अशी चर्चा आहे.

(Edited by Avinash Chandane)

R...

Shambhuraj Desai, Eknath Shinde
Ajit Pawar : पहिल्यांदाच कल्याणमध्ये आलेल्या अजितदादांच्या स्वागताला रिकाम्या खुर्च्या; सभेला तुरळक गर्दी

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com