Thane-Kalyan Political News : लोकसभा निवडणुकीचे बिगुल कोणत्याही क्षणी वाजले हे सांगता येत नाही. या पार्श्वभूमीवर 'शिवसेनेचे ठाणे आणि ठाण्याची शिवसेना' ही जुनी ओळख आहे. शिवसेना फुटीनंतर ठाणे हा मुख्यमंत्र्यांचा बालेकिल्ला समजला जात आहे. यातच ठाणे आणि कल्याण या लोकसभा निवडणुकीचे मैदान राखण्यासाठी ठाकरे आणि शिंदे या गटांची अवस्था 'करो या मरो' सारखी होणार आहे.
एकीकडे शिंदे गटाने या मतदारसंघात बैठक आणि विविध कार्यक्रमांचा सपाटा लावला आहे. तर ठाकरे पितापुत्रांनी भेटीगाठीला सुरुवात केली. शिवसेनेचे दोन्ही गट ठाणे आणि कल्याणमध्ये अॅक्शनमोडवर आल्याने निवडणुकीपूर्वीच येथील वातावरण तापले आहे.
ठाण्याने शिवसेनेला राजकीय सत्तेचे दार पहिल्यांदा उघडून दिले. त्यामुळे स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे ठाण्याकडे विशेष लक्ष होते. त्यानंतर ठाणे महापालिकेवरच नाही तर जिल्ह्यात शिवसेनेचा (Shivsena) झेंडा कायम फडकताना दिसत आहे.
शिवसेना फुटल्यानंतर जिल्ह्यातील काही आमदार, खासदार, स्थानिक स्वराज्य संस्थेमधील लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांनी ठाकरेंची साथ सोडली आणि शिंदेंना पाठिंबा दिला. परिणामी ठाणे जिल्हा हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. याच बालेकिल्ल्यातील ठाणे आणि कल्याण या दोन्ही मतदारसंघात शिवसेनेच्या दोन्ही गटात चुरस वाढल्याचे पाहायला मिळत आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
या दोन्ही लोकसभा मतदारसंघावर शिंदे गटाने सुरुवातीपासूनच दावा सांगितला आहे. त्यातच भाजपनेही दोन्ही मतदारसंघावर दावा ठोकला होता. त्यातून भाजप कल्याणाचा दावा सोडून ठाण्यातील दाव्यावर ठाण मांडून आहेत. दुसरीकडे ठाणे आणि कल्याण येथे महाविकास आघाडीचे उमेदवार हे ठाकरे गटाचे असतील असे चित्र सध्या दिसत आहे.
त्यानुसार नेते तथा आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी नुकतीच ठाणे मतदारसंघात भेटीगाठीला सुरू केली आहेत. तर कल्याण येथे उध्दव ठाकरे हे या आठवड्यात भेटीगाठींसाठी येणार आहेत. अशाप्रकरे ठाकरे पितापुत्रांचा अॅक्शन मोडवर आल्याचे पाहण्यास मिळत आहे.
या दोन्ही मतदारसंघात ठाकरे गटाची संघटनास्थिती मजबूत आहे. त्यांच्या मदतीला दोन मित्र पक्ष असल्याने हीच त्यांची जमेची बाजू आहे. तर शिंदे गटाचे कल्याणमधील उमेदवार हे मुख्यमंत्री शिंदे यांचे खासदार पुत्र आहेत. त्यातच भाजप आणि अजित पवार गटाची साथही त्यांच्यासाठी जमेची बाजू ठरणार आहे. हे खरे असलेले तरी ठाकरे आणि शिंदे या गटांना ठाणे जिल्हा नेमका कोणाचा बालेकिल्ला आहे, ही येणारी निवडणूक ठरवणार आहे.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.