Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचं शक्तिप्रदर्शन, शिंदेंची राजकीय कोंडी?

Eknath Shinde : शिंदेंना ठाण्यातच मित्रपक्ष भाजपकडूनच आव्हान?
Eknath Shinde
Eknath ShindeSarkarnama

ठाणे : इतर राजकीय पक्षांच्या बालेकिल्ल्यात भाजपने विशेष लक्ष देण्याचे लक्ष्य निश्चित केले आहे. राष्ट्रवादीच्या बारामती या बालेकिल्ल्यात भाजपच्या नेत्यांनी केलेल्या दौऱ्यानंतर आता भाजपने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्याच्या बालेकिल्ल्यात आता लक्ष केंद्रित करण्याचे ठरवले आहे. ठाण्यात पक्षाची शक्ती वाढवण्यासाठी आता भाजपकडून भव्य बाईक रॅली आणि मेळाव्यांचं आयोजन करण्यात आलेले आहे. यामुळे आता शिंदेंना ठाण्यातच मित्रपक्ष भाजपकडूनच आव्हान निर्माण होत असल्याची चर्चा होत आहे.

ठाण्यात भाजपकडून पक्षविस्ताराचं ध्येय डोळ्यासमोर ठेवून, ताकद वाढवण्याच्या दृष्टीने भव्य बाईक रॅली आणि मेळाव्यांचं आयोजन करण्यात आलेले आहे. स्वत: प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात हे शक्तीप्रदर्शन होणार आहे. आता शिंदेच्या बालेकिल्ल्यातच भाजप शिंदेवर मात करण्यासाठी ताकद निर्माण करत असल्याने आता शिंदेना याचा राजकीय कोंडी होणार, असल्याचे बोलेले जात आहे.

Eknath Shinde
Nawab Malik यांना ईडीचा पुन्हा दणका ; राहत्या घरासह सर्व मालमत्ता होणार जप्त

मुख्यमंत्री शिंदे यांच्याच ठाण्याच्या बालेकिल्यात भाजपने आज शक्तीप्रदर्शन करण्याचे नियोजन केले आहे. बावनकुळे याचसंदर्भात आज दिवसभर ठाण्यात विविध बैठका घेऊन शक्ती प्रदर्शनाची तयारी पाहणार आहेत. भाजपच्या कार्यकर्त्यांना पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी विशेष सूचना दिल्या आहेत. बावनकुळे स्वत: बाईक रॅलीत सहभाग होणार आहेत.

बाईक रॅलीच्या माध्यमातून शक्तीप्रदर्शन झाल्यानंतर सायंकाळी कार्यकर्ता मेळावा होणार आहे. या मेळाव्यात चंद्रशेखर बावनकुळे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. ठाण्यात पक्षाची ताकद वाढवण्यासाठी काही सूचना व आदेश देणार आहेत.

Eknath Shinde
शरद पवार ब्रीच कॅंडीतून थेट शिर्डीत राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर दाखल

महापालिका निवडणुका कोणत्याही क्षणी लागण्याची शक्यता आहे. याच दृष्टीकोनातून भाजपने ठाणे शहरात आपला पक्ष भक्कम करण्यासाठी पावले टाकत आहे. यावेळी बावनकुळे यांनी आपली प्रतिक्रीयाही व्यक्त केली. "कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह आहे. युवा कार्यकर्त्यांनी बाईक रॅलीचे आयोजन केलं आहे. मी यामध्ये सहभागी होत, हा उत्साह द्विगुणीत करणार आहे. आमची भाजपची संघटना महाराष्ट्रात सर्वात मोठी संघटना करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com