Ganpat Gaikwad गोळीबार प्रकरणात नवा ट्विस्ट; मुलाला पोलिसांची क्लिन चीट

Ganpat Gaikwad News : भाजपचे माजी आमदार गणपत गायकवाड यांनी केलेल्या गोळीबार प्रकरणातून मुलगा वैभव याला क्लिन चीट देण्यात आली आहे.
Ganpat Gaikwad, Vaibhav Gaikwad
Ganpat Gaikwad, Vaibhav GaikwadSarkarnama
Published on
Updated on

Thane News : भाजपचे माजी आमदार गणपत गायकवाड यांनी वर्षभरापूर्वी केलेल्या गोळीबार प्रकरणात नवीन ट्विस्ट आला आहे. गायकवाड यांचा मुलगा वैभव याला या प्रकरणात क्लिन चीट देण्यात आली आहे. वैभव विरोधात कोणतेही ठोस पुरावे न आढळून आलेले नाहीत. त्यामुळे पोलिसांनी उल्हासनगर न्यायालयात दाखल केलेल्या पुरवणी चार्जशीटमध्ये केवळ दोनच आरोपींचा समावेश केला आहे.

गतवर्षी 2 जानेवारी रोजी उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस स्टेशनमध्ये गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) यांनी गोळीबार केला होता. पोलीस निरीक्षकांच्या केबिनमध्येच शिवसेनेचे तत्कालीन शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर सहा राऊंड फायर केले होते. यात महेश गायकवाड आणि त्यांचे सहकारी राहुल पाटील हे गंभीर जखमी झाले होते. जमिनीच्या वादातून हा प्रकार घडल्याचे समोर आले होते.

Ganpat Gaikwad, Vaibhav Gaikwad
Sharad Pawar On Sanjay Raut: शिंदेंच्या सत्कारावरुन आदळआपट करणाऱ्या राऊतांचा पवारांनी एकाच वाक्यात निकाल लावला

त्यानंतर गणपत गायकवाड यांच्यासह अन्य काही आरोपींंना अटक केली होती. तेव्हापासून गायकवाड तुरुंगातच आहेत. पोलिसांनी सुरूवातीला दाखल केलेल्या चार्जशीटमध्ये वैभव गायकवाडचेही नाव होते. मात्र आता दाखल केलेल्या पुरवणी चार्जशीटमधून वैभवचे नाव वगळण्यात आले आहे. पुरवणी चार्जशीटमध्ये दोन आरोपींचा समावेश करण्यात आला आहे. नागेश बडेराव आणि कुणाल पाटील अशी त्यांची नावे आहेत.

Ganpat Gaikwad, Vaibhav Gaikwad
Devendra Fadnavis : माणिकराव कोकाटेंना मुख्यमंत्री फडणवीसांनी खडसावले; म्हणाले, 'तो माझा...'

याबाबत पोलिसांना विचारले असता, वैभव गायकवाड (Vaibhav Gaikwad) याच्या विरोधात कोणतेही ठोस पुरावे आढळून आले नाहीत. त्याचा या गुन्ह्यात कोणताही सहभाग नाही, गोळीबार होण्यापूर्वीच तो पोलीस ठाण्याच्या ही बाहेर पडला होता. सीसीटीव्हीतून हे स्पष्ट होते. त्यामुळे चार्जशीटमधूनही त्यांचे नाव वगळण्यात आले आहे. पण वैभव गायकवाड अद्याप फरार असून, त्याचा शोध सुरू आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com