KDMC Election: निवडणूक बंदोबस्तावरील पोलिसाचा संताप! मंजूर केला केवळ 500 रुपये भत्ता; उचललं स्वाभिमानी पाऊल

KDMC Election: राज्यातील २९ महापालिका निवडणुकांचे निकाल नुकतेच जाहीर झाले. या निवडणुकांमध्ये केवळ राजकीय नेते मंडळी, उमेदवार आणि मतदार अशीच चर्चा होत असली तरी ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यामागे अनेकजण राबत असतात.
Police
Police
Published on
Updated on

KDMC Election: राज्यातील २९ महापालिका निवडणुकांचे निकाल नुकतेच जाहीर झाले. या निवडणुकांमध्ये केवळ राजकीय नेते मंडळी, उमेदवार आणि मतदार अशीच चर्चा होत असली तरी ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यामागे अनेक हात असतात. यामध्ये निवडणूक अधिकाऱ्यांपासून पोलिसांचा महत्वाचा सहभाग असतो. सकाळपासून रात्री उशीरापर्यंत निवडणूक निर्विघ्न पार पाडण्याची जबाबदारी पोलिसांवर असते, त्यासाठी ही पोलीस मंडळी अहोरात्र कर्तव्य बजावत असतात. पण या पोलिसांना भत्ता किती दिली जातो? हे जर तुम्हाला सांगितलं तर तुमचीही तळपायाची आग मस्तकात जाईल. पण एका पोलिस कर्मचाऱ्यानं आपलं कर्तव्य बजावल्यानंतर मंजूर झालेल्या भत्त्याबाबत मोठं पाऊल उचललं आहे.

Police
Rupali Thombre: भाजपकडून EVM मध्ये फेरफार केल्याचा आरोप; रूपाली ठोंबरेंनी घेतला मोठा निर्णय

कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीसाठी तैनात असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याबाबत हा प्रकार घडला आहे. या पोलीस कर्मचाऱ्याला केडीएमसीच्या शाळा क्रमांक १९ मधील एका बुथवर ड्युटी लागली होती. दिवसभर या ठिकाणी ड्युटी केल्यानंतर या पोलीस कर्मचाऱ्याला केवळ ५०० रुपये भत्ता मंजूर करण्यात आला. हा भत्ता मिळाल्याची रक्कम स्विकारल्यानंतर देयकावर आपल्या नावासमोर सही करायची असते.

या ठिकाणी या कर्चमाऱ्यानंही सही केली पण देयक स्विकारलं नाही, हे देयक मी शासनाला परत करतो आहे, असं संदेश त्यानं सहीच्या ठिकाणी लिहिला. हे देयक सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. विशेष म्हणजे या देयकावर शाळेत शिपाई म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला १५५० रुपये भत्ता मंजूर झाला. तर जनसंपर्क अधिकारी म्हणून काम करणाऱ्याला २०००, पीओंना १७०० रुपये भत्ता दिला आहे.

Police
Uddhav Thackeray: "आमच्या पराजयाला तेज, त्यांच्या विजयाला डाग"; उद्धव ठाकरेंची महायुतीवर टीका
KDMC Municipal Corporation
KDMC Municipal Corporation

दरम्यान, महानगरपालिका निवडणुकीदरम्यान अहोरात्र कर्तव्य बजावणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याला केवळ ५०० रुपये भत्ता देण्यात आल्याने संताप व्यक्त होत आहे. हा भत्ता अन्यायकारक व अपमानास्पद असल्याचे सांगत संबंधित पोलिस कर्मचाऱ्याने तो परत करून निषेध नोंदवला. त्यामुळं हा मुद्दा केवळ पैशांचा न राहता पोलीस दलाच्या सन्मान व आत्मसन्मानाचा बनला आहे. लोकशाही टिकवण्यासाठी निष्ठेने काम करणाऱ्या पोलिसांच्या कष्टांची अवहेलना करण्यात आल्याची सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com