Uddhav Thackeray: "आमच्या पराजयाला तेज, त्यांच्या विजयाला डाग"; उद्धव ठाकरेंची महायुतीवर टीका

Uddhav Thackeray: मुंबई महापालिका निवडणुकीतील नवनिर्वाचित शिवसेनेच्या नगरसेवकांना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज संबोधित केलं.
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Uddhav Thackeray: मुंबई महापालिका निवडणुकीतील नवनिर्वाचित शिवसेनेच्या नगरसेवकांना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज संबोधित केलं. यामध्ये त्यांनी सर्वप्रथम ज्या भागात ते गेले नाहीत, तिथल्या जनतेप्रती दिलगिरी व्यक्त केली. तसंच सत्तेपासून दूर असले तरी महापौरपदी आपल्या पक्षाचाच नगरसेवक व्हावा अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. पण नेमकं त्यांनी काय म्हटलं आहे? यामागं त्यांची नेमकी इच्छा काय आहे? जाणून घेऊयात.

Uddhav Thackeray
Rupali Thombre: भाजपकडून EVM मध्ये फेरफार केल्याचा आरोप; रूपाली ठोंबरेंनी घेतला मोठा निर्णय

नवनिर्वाचित नगरसेवकांशी संवाद साधताना मातोश्रीवरुन बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, "आपला महापौर व्हायला पाहिजे ही तर इच्छा आहेच, पण देवाच्या मनात असेल तर ते ही होईल" ठाकरेंनी व्यक्त केलेल्या इच्छेनंतर उपस्थित नगरसेवकांनी त्यांना उस्फुर्त प्रतिसादही दिला. पण यामध्ये देवाच्या मानत असेल तर...असं जेव्हा उद्धव ठाकरे म्हणतात तेव्हा या देवाचा काही राजकीय अर्थही काढता येऊ शकतो. यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही महाराष्ट्रात देवाभाऊ असं संबोधलं जातं. त्यामुळं ठाकरेंनी उल्लेख केलेला हा 'देवा' नेमका कोणता? अशी चर्चाही सुरु झाली आहे.

Uddhav Thackeray
Sangli Corporation : जयश्रीताई, पृथ्वीराज पाटलांना सोबत घेऊनही सांगलीत भाजप तोट्यातच; विरोधकांनी आणले जेरीस

प्रचाराला गेलो नाही तिथल्या मतदारांची दिलगिरी

दरम्यान, नगरसेवकांशी चर्चेनंतर ठाकरेंनी पत्रकार परिषदही घेतली. यावेळी त्यांनी सुरुवातीला ज्या भागात आपण गेलो नाहीत तिथल्या जनतेप्रती दिलगिरी व्यक्त केली. ठाकरे म्हणाले, सर्वच महापालिकांच्या प्रचाराला मी जाऊ शकलो नाही. जेमतेम मुंबई, ठाणे, नाशिक आणि संभाजीनगर या महापालिकांच्या प्रचाराला गेलो होतो. चंद्रपूरमध्ये सुद्धा शिवसेनेचे चांगले नगरसेवक निवडून आले तसंच परभणी इथं देखील चांगले नगरसेवक निवडून आले. सर्वप्रथम मी जिथं जाऊ शकलो नाही तिथल्या सर्व शिवसैनिकांची आणि मतदारांची मी दिलगिरी व्यक्त करतो.

Uddhav Thackeray
Uddhav Thackeray: "आमच्या पराजयाला तेज, त्यांच्या विजयाला डाग"; उद्धव ठाकरेंची महायुतीवर टीका

आमच्या पराजयाला तेज, त्यांच्या विजयाला डाग

त्यांच्यालेखी आमचा जरी पराजय असला तरी आमच्या पराजयाला तेज आहे तर त्यांचा विजय हा डागाळलेला आहे. तसंच ज्यांच्या सहकाऱ्यानं ते महापौर बनवत असतील त्यांना लाज वाटली पाहिजे की आपण काय केलं आहे. म्हणे बाळासाहेबांचा विचार...बाळासाहेबांचा विचार हाच होता की शिवसेनेचा महापौर असला पाहिजे, त्यामुळं त्यांनी याचा विचार केला पाहिजे की आपण काय पाप केलं आहे. यानंतर मराठी माणूस त्यांना काय करणार आहे? याचा विचार त्यांनी केला पाहिजे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com