Shivsena News : 'स्वप्न' बाळासाहेबांचे की लोकसभेसाठी मतांच्या बेरजेच्या जुळवाजुळवीचे

Political News : या माध्यमातून शिवसेना शिंदे गटाचे मतदार राजाला आकर्षित करण्याचे प्रयत्न.
shrikant shinde, Eknath Shinde
shrikant shinde, Eknath Shindesarkarnama
Published on
Updated on

Thane News : आगामी काळात लोकसभा निवडणुक कोणत्याही क्षणी लागतील याचे नेम नाही. त्यामुळे राजकीय पक्षांकडून जोरदार तयार सुरू झाली आहे. एकीकडे फोडाफोडीच्या राजकारणापासून धार्मिक कार्यक्रमांचा धडाका सुरू झाला आहे. त्यातच प्रत्येक संधीचे सोने करण्यापासून मतदार राजाला आकर्षित करण्यापर्यंत कसून प्रयत्न सुरू केल्याचे दिसत आहेत. याशिवाय आरोप-प्रत्यारोपाने राजकीय वातावरणही चांगेलच तापले आहे.

येत्या २२ जानेवारीला अयोध्येत उभारण्यात येत असलेल्या मंदिरात प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा होणार आहे. त्या मंदिराच्या उभारणीसाठी शिवसेना शिंदे गटाने ११ कोटींची मदत करून जणू खारीचा वाटा उचलला आहे. ही बाब महाराष्ट्रासाठी गर्वाची तसेच तितकीच अभिमानास्पद सुद्धा आहे. मात्र, यावेळी बाळासाहेबांचे स्वप्न आता पूर्ण होत आहे, असे उद्गार शिंदे गटाकडून काढण्यात आले.

त्यामुळे खरच, हे बाळासाहेबांचे स्वप्न की आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ही मतांच्या बेरजेची जुळवाजुळव असल्याचे दिसत आहे. या माध्यमातून शिंदे गटाने मतदारराजाला आकर्षित करण्याचा प्रयत्न सुरू केल्याचे दिसत आहे.

shrikant shinde, Eknath Shinde
Buldhana : केंद्रीय मंत्री भुपेंद्र यादव यांच्या कार्यक्रम खासदार जाधवांनी टाळला की...

शिवसेनेचे दोन तुकडे झाल्याने शिवसेना शिंदे गटाने भाजपशी जुळवून घेतले आहे. त्या दोघांच्यामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गट सामील होऊन महायुती तयार झाली आहे. तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट यांची महाविकास आघाडी आहे. यांच्यामध्ये चुरशीची लढत होणार ही काळ्या दगडावरील पांढरी रेघ आहे.

ठाणे जिल्हा हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Ekanath Shinde ) यांचा बालेकिल्ला आहे. असे म्हटले जात आहे. त्यातच, मलंगगड मुक्ती ही माजी शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख स्वर्गीय आनंद दिघे यांनी दिलेली एक हाक आहे. तर अयोध्यात राम मंदिर उभारणे हे बाळासाहेबांचे स्वप्न आहे. हेच प्रमुख मुद्दे डोळ्यासमोर शिंदे गट कामाला लागला आहे.

नुकतेच शिंदे गटाने ११ कोटींचा धनादेश राम मंदिर ट्रस्टच्या स्वाधीन केला. त्यापूर्वी मलंगगडावर धार्मिक सप्ताह आयोजित केला. यावरून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिंदे गटाकडून कल्याण लोकसभेत मतांच्या बेरजेची जुळवाजुळव सुरू केल्याचे दिसू लागले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

प्रतिस्पर्धी येण्यापूर्वीच निवडणूक झाली प्रतिष्ठेची

कल्याण लोकसभा मतदारसंघावर शिंदे गटाने दावा केला आहे. डॉ. श्रीकांत शिंदे (Shrikant shinde) हे त्या मतदारसंघाचे खासदार असल्याने त्यांच्यासमोर अद्यापही कोणत्याही पक्षाने उमेदवार जाहीर केलेला नाही. पण,दुसरीकडे शिंदे गटाने मात्र कल्याण लोकसभा निवडणूक प्रतिष्ठेची करून ठेवली आहे. त्यातच निवडणूक जाहीर होण्यापूर्वी तेथे शिंदे गटाने चांगलीच कंबर कसल्याचे दिसत आहे.

(Edited by Sachin Waghmare)

shrikant shinde, Eknath Shinde
CM Eknath Shinde : विरोधकांना काही काम उरलं नाही..! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंना टोला...

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com