Jitendra Awhad News: राजकीय मैदानात आणखी विकेट घेणार; CM शिंदेंच्या वक्तव्यावर आव्हाडांचं प्रत्युत्तर म्हणाले, "कोणाच्या विकेट पडतील..."

Jitendra Awhad On Eknath Shinde: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पार्टीचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awad) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या "राजकीय मैदानात आणखी विकेट घ्यायच्या आहेत म्हणून क्रिकेट खेळलो." या विधानाचा समाचार घेतला आहे.
Jitendra Awhad, Eknath Shinde
Jitendra Awhad, Eknath ShindeSarkarnama

Thane Lok Sabha Election: राज्यात आज लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी मतदान होत आहे. मतदानाच्या शेवटच्या दिवशी देखील राजकीय पक्षांकडून विरोधकांवर जोरदार आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पार्टीचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या "राजकीय मैदानात आणखी विकेट घ्यायच्या आहेत म्हणून क्रिकेट खेळलो." या विधानाचा समाचार घेतला आहे.

जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) म्हणाले, कोणाच्या विकेट पडतील, काय पडतील? हे मतदार राजा ठरवेल, असं कोणाच्या बोलण्याने विकेट पडत नाहीत, असं म्हणत आव्हाडांनी मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर दिलं. तसेच ते (महायुती) 50 जागा जिंकेल, वरील तीन जागा ते पाकिस्तानातूनही घेतील त्यांचा काय भरोसा नाही असा टोला त्यांनी यावेळी युतीला लगावला. दरम्यान, ठाणे लोकसभा मतदारसंघात (Thane Lok Sabha Constituency) बोगस मतदान मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचा आरोप केला. तसेच शासकीय यंत्रणा हाताशी धरुन, जिथे त्यांना मतदान कमी होणार आहे त्या मतदान केंद्रावरील मशीन स्लो केल्या जातं असल्याचा आरोप आव्हाडांनी केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

ते म्हणाले, एक मत द्यायला जर पाच मिनिटं लागणार असतील तर पूर्ण दिवसात 120 मतदानाच पूर्ण होईल, यादी चौदाशेची आहे, निवडणूक आयोग जर कोणाच्या इशाऱ्यावर काम करणार असेल आणि अधिकारी मुद्दाम मशीन स्लो करणार असतील, तर निवडणुकाच घेऊ नका, त्या रद्द करून टाका असं आव्हाड म्हणाले. शिवाय हे मतदान मुख्यमंत्र्यांच्या (Eknath Shinde) ठाण्यात होत आहे. म्हणूनच ते बोगस होत आहे, सर्वच प्रशासकीय यंत्रणा त्यांनी कामाला लावली आहे. दोन हजार लोक बाहेरून बोगस मतदान करायला त्यांनी आणली होती, दहा बोगस मतदान महाराष्ट्र शाळेत झालं असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.

निवडणूक ही कोणत्याही दबावाखाली होता कामा नये, हे असं दमदाटी करून पोरं घुसवून असं मतदान होत नाही. ज्या पद्धतीने यंत्रणा वापरली जातेय ही लाज आणणारी गोष्ट आहे, शासनाचा इतका हस्तक्षेप चांगला नाही, सत्तेचा अमर पट्टा कोणीही घेऊन आलेला नाही, हे अधिकाऱ्यांनी पण लक्षात ठेवावं. पोलिस अधिकारी असो वा कोणताही आतील कर्मचाऱ्यांनी हे लक्षात ठेवावं. तसंच मुद्दाम मशीन स्लो केलं जात आहे. जिथे मराठी मतं कमी पडत आहेत असं वाटतंय तिथे पण वोटिंग स्लो केलं जात असल्याचा आरोप आव्हाडांनी केला.

Jitendra Awhad, Eknath Shinde
Nashik Lok Sabha Election 2024 : भाजप आमदार देवयानी फरांदे आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार बाचाबाची !

ठाण्यात बोगस मतदानाचा सुळसुळाट

ठाण्याचे ठाकरे गटाचे उमेदवार खासदार राजन विचारे (Rajan Vichare) यांनी आज सेंट जॉन शाळेत जाऊन मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर त्यांनी ठाण्यातील बहुतेक मतदान केंद्रावर सकाळी लवकर बोगस मतदान झाल्याचा आरोप केला. मतदार मतदान करायला गेल्यानंतर त्याला आपल्या नावाचं मतदान दुसऱ्याच कोणीतरी केल्याचं निर्दशनास येत असल्याच विचारे म्हणाले. शिवाय आपला मतदानाचा हक्क वाया घालवू नका आपले मतदान करण्यासाठी निवडणूक आयोगाने 7 नंबरचा फॉर्म भरून पोस्टल बॅलेट द्वारे टेंडर वोट करून घेण्याची सुविधा दिली आहे. त्यामुळे प्रत्येकाने मतदान करावे असे आवाहन विचारे यांनी केलं आहे.

(Edited By Jagdish Patil)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com