Kapil Patil and Kisan Kathore : मंत्री कपिल पाटील आणि आमदार किसन कथोरे यांचे मनोमिलन झालं म्हणायचं?

MLA Kisan Kathore News : मागील अनेक महिन्यांपासून कथोरे आणि पाटील यांच्यात शीतयुद्ध सुरू होते.
Kapil Patil and Kisan Kathore
Kapil Patil and Kisan KathoreSarkarnama
Published on
Updated on

BJP Politics : भाजप आमदार किसन कथोरे यांच्या आमदारकीच्या १९ वर्षे पूर्णत्वाच्या कार्यक्रमाला केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी हजेरी लावली. पाटील यांची ही अचानक झालेली एन्ट्री पाहून साऱ्यांच्याच भुवया उंचावल्या. कपिल पाटील यांनी आमदार कथोरे यांना शुभेच्छा दिल्या, तर कथोरे यांनीदेखील पुष्पगुच्छ देत त्यांचे स्वागत केले.

गेल्या अनेक महिन्यांपासून कथोरे आणि पाटील यांच्यात शीतयुद्ध सुरू असताना अचानक झालेल्या या भेटीने त्यांचे मनोमिलन झाले का ? याविषयी एकच चर्चा रंगली आहे, तर आगामी काळातील लोकसभा निवडणुका व भिवंडी मतदारसंघ भाजपकडे राखण्यासाठी तयारी केली जात असल्याचेही बोलले जात आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Kapil Patil and Kisan Kathore
Yuva Sangharsh Yatra Suspend : ...तर, होय मी घाबरलो ; युवा संघर्ष यात्रा स्थगित करताना रोहित पवारांचं विधान!

बदलापूर येथे आज भाजप आमदार किसन कथोरे यांच्या आमदारकीच्या कारकिर्दीस १९ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास मंत्री कपिल पाटील यांनी उपस्थिती लावली. या वेळी विधान परिषदेचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रेही उपस्थिती होते.

गेल्या अनेक महिन्यांपासून केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील आणि मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे यांच्यात शीतयुद्ध सुरू असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र, शुक्रवारी रात्री दोघांच्या या भेटीने वेगळीच चर्चा सुरू झाली आहे.

मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार कपिल पाटील हे दोघेही नेते भाजपचे मोठे नेते म्हणून ओळखले जातात. काही वर्षांपूर्वी कपिल पाटील यांच्या गळ्यात केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री पदाची माळ पडली. मात्र, एकाच पक्षाचे नेते असूनही गेल्या काही महिन्यांत दोन्ही नेत्यांमध्ये शीतयुद्ध सुरू असल्याचे जाणवत होते. अप्रत्यक्षपणे दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर कुरघोडी करण्याची संधी सोडली नव्हती.

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकी नंतर केंद्रीय मंत्री कपिल पाटील आणि आमदार किसन कथोरे यांच्यात नाव न घेता शीतयुद्ध रंगले होते. त्यानंतर दोन्ही नेत्यांकडून वरिष्ठांकडे आपली बाजूही मांडण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही दोघांमध्ये विस्तव जात नव्हता.

Kapil Patil and Kisan Kathore
BJP Political News : प्रचंड राजकीय गदारोळानंतर अखेर भाजपकडून 'ते' ट्विट डिलीट; महायुतीत नेमकं चाललंय तरी काय ?

या दोघांच्या शीतयुद्धामुळे कार्यकर्तेही संभ्रमात होते. त्यामुळे दोन्ही नेत्यांनी सबुरीने घेऊन मनोमिलन करावे, अशी आशा व्यक्त होत होती. यातच विधान परिषद आमदार म्हात्रे यांच्यामुळे हा दूरावा कमी झाल्याचे बोलले जात आहे. मात्र, याबाबत अधिकृतरित्या कोणीही प्रतिक्रिया अद्याप दिलेली नाहीं.

Kapil Patil and Kisan Kathore
Administration - Politics : प्रशासकीय अधिकारी राजकारणात,अनेकजण तरले,काहीजण फसले...

कपिल पाटील यांच्या आगमनाची घोषणा

शुक्रवारी आमदार किसन कथोरे यांच्या राजकीय कारकिर्दीला ४२ वर्षे आणि आमदारकी कारकिर्दीला १९ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल त्यांच्या समर्थकांनी त्यांचा गौरव सोहळा आणि प्रकट मुलाखत आयोजित केली होती.

या मुलाखत कार्यक्रमाच्या सुरुवातीला केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या आगमनाची घोषणा झाली आणि अनेकांच्या भुवया उंचावल्या. मुलाखत सुरू होण्यापूर्वी मंत्री कपिल पाटील कार्यक्रमस्थळी पोहोचून त्यांनी आमदार किसन कथोरे यांचे अभिनंदन केले.

त्यानंतर काही काळ पाटील यांनी किसन कथोरे यांची मुलाखत ऐकली. या प्रसंगामुळे गेल्या महिन्यांपासून सुरू असलेला वाद संपुष्टात आल्याचे बोलले जाते आहे, तर या दोघांच्या मनोमिलनानंतर संकटात असलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com