Sharad Pawar, Raj Thackeray sarkarnama
ठाणे

Dombiwali News : राज ठाकरेंचे वर्मावर बोट; शरद पवारांना आज रायगड कसा आठवला..?

Raj Thackearay लोकसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर लोकसभा मतदारसंघाची चाचपणी करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे कल्याण दौऱ्यावर आले आहेत.

Bhagyashree Pradhan

Dombiwali News : कायमच फुले, शाहू, आंबेडकर यांची आठवण करणाऱ्या शरद पवारांना आज छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण झाली का. आज त्यांना रायगड कसा आठवला, असा प्रश्न मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी डोंबिवलीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत उपस्थित केला आहे.

लोकसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर लोकसभा मतदारसंघाची चाचपणी करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे कल्याण दौऱ्यावर आले आहेत. या वेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना शरद पवार यांच्यावर टीका केली. या वेळी त्यांनी ईव्हीएमवर बोलताना इतरत्र सर्वच देशात बॅलेट पेपरच्या निवडणुका चालतात, तर मग भारतामध्ये अशा निवडणुका का नाही चालत. सामान्य जनता कोणाला मत देते हेसुद्धा त्यांच्या लक्षात येत नाही.

मध्यंतरी काही ईव्हीएमवर स्लिप देण्यात येणार होती असे बोलले जात होते. मात्र, तेही सगळीकडे लागू पडलेले नाही. त्यामुळे ईव्हीएमचा घोळ आहे हे मी कायमच बोलत होतो. मी सगळ्या गोष्टी आधी अभ्यास करतो, त्यानंतर बोलतो असे त्यांनी सांगितले. पक्ष विरुद्ध पक्ष चिन्ह विरुद्ध चिन्ह अशा पद्धतीने राजकारण लढणे हे महाराष्ट्रातील चांगले चिन्ह नाही. हे सगळे सुधारायचे असेल तर जनतेने भानावर येणे आवश्यक आहे.

या सर्व लोकांना जनतेनेच वटणीवर आणले पाहिजे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावेत हे ठीक, पण त्यासाठी राज्याच्या पातळीवर काय राजकारण खेळले जाते हे पाहणे खूप महत्त्वाचे आहे. नवीन लोक राजकारणात येत आहेत. मात्र, अशा पद्धतीने राजकारण खेळत असल्याने त्यांना हेच राजकारण खरे असल्याचे वाटते. याआधी कधीही महाराष्ट्रात अशी अस्थिर परिस्थिती मी अनुभवली नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

बेरोजगार, पाणी प्रश्न या प्रश्नांकडे दुर्लक्ष करण्यासाठी जातीचे राजकारण केले जात आहे. काही गोष्टींना थांबवण्यासाठी त्या- त्या राज्यातील स्थानिक राजकीय पक्ष खूप महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात. त्यामुळे हे पक्ष अधिक मजबूत वाघ होणे गरजेचे असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत नमूद केले. शाळेतल्या शिक्षकांना निवडणूक आयोगाचे अधिकारी कामाला जुंपतात. या सगळ्यांमध्ये निवडणूक आयोगाचे अधिकारी करतात काय ? ही यंत्रणा अपुरी आहे असे ते सांगतात, तर मग हे काम कसे करतात, असा प्रश्नदेखील त्यांनी उपस्थित केला.

Edited By : Umesh Bambare

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT