Kalyan Dombiwali : शिवसेनेचे वर्चस्व रोखण्यासाठी शिंदे गटाची मोठी खेळी!

ही १८ गावे वगळून कल्याण डोंबिवली महापालिकेची निवडणूक घेण्याचा घाट शिंदे गटाने घातल्याचे दिसून येत आहे.
Eknath Shinde-Uddhav Thackeray
Eknath Shinde-Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

डोंबिवली : कल्याण डोंबिवली (Kalyan Dombiwali) महापालिकेच्या (केडीएमसी) कार्यक्षेत्रातील २७ गावांपैकी १८ गावे वगळून त्यांची स्वतंत्र कल्याण उपनगर परिषद करण्याचा निर्णय तत्कालीन ठाकरे सरकारने (Thackeray Government) घेतला होता. सध्या हे प्रकारण न्यायप्रविष्ठ आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाने शिवसेनेला (Shivsena उद्धव बाळासाहेब ठाकरे) खिंडीत गाठण्यासाठी मोठी खेळी खेळल्याची चर्चा कल्याण डोंबिवली परिसरात रंगली आहे. (Shinde group made a big move to stop Shiv Sena's supremacy)

ही १८ गावे वगळून कल्याण डोंबिवली महापालिकेची निवडणूक घेण्याचा घाट शिंदे गटाने घातल्याचे दिसून येत आहे. त्यासाठी १८ गावे वगळून केडीएमसी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याचा अर्ज राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केला आहे. कारण, या अठरा गावांवर ठाकरे गटाचे वर्चस्व आहे. त्यामुळे आपल्या गटाचा फायदा करून घेण्यासाठी १८ गावे वगळण्यासाठी शिंदे गटाने प्रयत्न सुरू केले आहेत. ही १८ गावे पालिका हद्दीतून शिंदे गटाच्या फायद्यासाठी वगळण्याची शक्यता आहे, असा गौप्यस्फोट याचिकाकर्ते संदीप पाटील यांनी केला आहे.

Eknath Shinde-Uddhav Thackeray
Solapur Lok Sabha : लोकसभेसाठी कपिल पाटील सोलापूर भाजपचे नवे ‘कॅप्टन’ : उमेदवार निवडीपासून ही आहेत तगडी आव्हाने

ठाकरे सरकारने २०२० मध्ये १८ गावे महापालिकेतून वगळण्याची आणि त्यांची कल्याण उपनगर नगर परिषद करण्याच्या दोन स्वतंत्र अधिसूचना काढल्या हेात्या. याचिकाकर्ते संदीप पाटील यांच्या आव्हानामुळे या दोन्ही अधिसूचना उच्च न्यायालयाने रद्द ठरविल्या आहेत. राज्य सरकार आणि कल्याण डोंबिवली महापालिका उच्च न्यायालयाच्या आदेशावर स्थगिती आणण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात जाण्याच्या अगोदर संदीप पाटील यांनी कॅव्हेट दाखल केले आहे

Eknath Shinde-Uddhav Thackeray
Tukaram Munde Transfer : तुकाराम मुंडेंच्या बदलीने भाजपच्या 'त्या' प्लॅनला लागला ‘ब्रेक’!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने प्रतिज्ञा पत्रासह एक अर्ज सर्वोच्च न्यायालयात दाखल केला आहे. कल्याण डोंबिवली पालिकेतील १८ गावे वगळून निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याची विनंती या अर्जात करण्यात आलेली आहे. यावर २५ नोव्हेंबर रोजी सुनावणी लावण्यात आली होती. मात्र, इतर खंडपीठांसमोर याची सुनावणी व्हावी, अशी ऑर्डर त्या कोर्टाने काढली. त्यामुळे पुढील सुनावणी लवकरच होईल, असेही याचिकाकर्ते पाटील यांनी सांगितले.

Eknath Shinde-Uddhav Thackeray
Maharashtra-Karnataka Border Dispute : कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची फुशारकी : म्हणे ‘महाराष्ट्राची याचिका सुप्रीम कोर्टात टिकणार नाही..’

महापालिकेतच असावीत २७ गावे

कल्याण डोंबिवली महापालिकेत समाविष्ठ केलेल्या १८ गावांमध्ये ठाकरे गटाचे समर्थक मोठ्या संख्येने आहेत. महापालिकेत ही १८ गावे राहिली, तर त्याचा ठाकरे गटाला मोठा फायदा होऊ शकतो. त्यामुळे गावे वगळून नागरिकांना खूश करून आपला फायदा करून घेण्याचा शिंदे गटाकडून प्रयत्न सुरू आहे, असेही याचिकाकर्ते पाटील यांनी सांगितले. पण, महापालिकेत २७ गावे असायला हवीत. त्यातून कल्याण डोंबिवली शहराचा विकास योग्य पद्धतीने होईल. ही १८ गावे वगळली तर त्या ठिकाणी झोपडपट्टीची नगर परिषद येथे बनू शकते, ते रोखण्यासाठी कल्याण डोंबिवलीमधून ही १८ गावे वगळू नयेत, अशी मागणी याचिका कर्ते संदीप पाटील यांनी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com