Kalyan Political News : आगामी लोकसभेच्या निवडणुकीत कल्याण लोकसभा मतदारसंघातील लढाई अत्यंत महत्त्वाची असणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे या मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे बोलले जात आहे. याआधीदेखील 2014 आणि 2019 ला त्यांनी येथूनच विजय मिळवलेला आहे.
या जागेबाबत महायुतीतील भाजप-शिवसेनेत दावे-प्रतिदावे सुरू आहेत. यातच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) या जागेसाठी चाचपणी करत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. राज ठाकरे कल्याण आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघाचा दोनदिवसीय दौरा करण्यात आहेत. परिणामी राजकीय वर्तुळातून तर्कवितर्क सुरू झाले आहेत. (Raj Thackeray Latest News)
कल्याण लोकसभेतील कल्याण ग्रामीण या विधानसभेत मनसेचे आमदार राजू पाटील (Raju Patil) आहेत. त्यामुळे कल्याण ग्रामीण पट्ट्यात मनसेची मोठ्या प्रमाणात मते असल्याचे पाहायला मिळते. मात्र, असे असले तरी खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) आणि आमदार राजू पाटील यांच्यात फारसे सौख्य नाही. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्यास राजू पाटील हे खासदार श्रीकांत शिंदे यांना मदत करतील, असे बोलले जाते.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
राज ठाकरे भिवंडी लोकसभा मतदारसंघाचीही पाहणी करणार आहेत. भिवंडीचे कपिल पाटील विद्यमान खासदार आहेत. या मतदारसंघातही मनसेचा आगरी मतांवर मोठ्या प्रमाणात पगडा आहे. मनसेचे कार्यकर्तेदेखील कल्याणमध्ये (Kalyan) मोठ्या प्रमाणात कार्यरत आहेत. या आधीदेखील राज ठाकरेंनी जेव्हा आंदोलने छेडली त्या- त्या वेळी कल्याणमधील मनसैनिक आक्रमक झालेले पाहायला मिळाले. त्यामुळे शुक्रवारच्या कल्याण दौऱ्यात राज ठाकरे हे मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना काय सांगणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
कल्याण-डोंबिवलीत फलकबाजी
कल्याणमध्ये अनेक राजकीय नेत्याचे दौरे सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच आता मनसेच्या राज ठाकरेंनीही एन्ट्री मारल्याने राजकीय वर्तुळातून भुवया उंचावल्या आहेत. मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे यांचा कल्याण आणि भिवंडी लोकसभेत दौरा आहे. यामध्ये अनेक पदाधिकाऱ्यांशी कार्यकर्त्यांची संवाद साधणार आहेत. त्याच अनुषंगाने त्यांच्या स्वागतासाठी कल्याण-डोंबिवली परिसरात मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी केल्याचे दिसून येत आहे.
(Edited by Sunil Dhumal)
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.