-शर्मिला वाळुंज
Dombivali News : कल्याण लोकसभेच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार वैशाली दरेकर यांच्या प्रचारासाठी शिवसेना गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभेचे आयोजन केले होते. पण अचानक वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाल्याने सभेच्या ठिकाणी असलेले सभा मंडप भिजला. पावसास सुरवात झाली तेव्हाच उद्धव ठाकरे यांची सभा होणार का, याची चर्चा कार्यकर्त्यांत सुरू झाली. पण, शरद पवार यांच्या सारखेच उद्धव ठाकरे देखील भर पावसात सभा घेतील असे शिवसैनिकांना वाटत होते, मात्र साऱ्यांचाच हिरमोड झाला.
इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीच्या कल्याण लोकसभेच्या उमेदवार वैशाली दरेकर राणे यांच्या प्रचारासाठी डोंबिवली पश्चिम येथील भागशाळा मैदान येथे सोमवारी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भिवंडीचे उमेदवार सुरेश म्हात्रे यांच्यासाठी कल्याण पश्चिम येथे सभा घेतली.
आज सोमवारी उद्धव ठाकरे यांच्या सभेचे आयोजन वैशाली दरेकर यांच्या प्रचारासाठी करण्यात आले होते. मात्र सोमवारी दुपारी अचानक वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस कल्याण डोंबिवली मध्ये पडला. अचानक आलेल्या पावसामुळे सभेच्या ठिकाणी असलेले सभा मंडप तसेच साउंड सिस्टीम भिजली आहे.
पावसास सुरवात झाली तेव्हाच उद्धव ठाकरे यांची सभा होणार का ? याची चर्चा सुरू झाली. शरद पवार यांच्या सारखेच उद्धव ठाकरे देखील भर पावसात सभा घेतील असे शिवसैनिक बोलत होते. मात्र साऱ्यांचाच हिरमोड झालं आहे.
अवकाळी पडलेल्या मुसळधार पावसामुळे आणि खराब, अंधुक, वादळी वातावरणामुळे आयोजित महासभा रद्द करण्यात आली आहे. सर्व संबंधितांनी याची नोंद घ्यावी आणि आपापल्या पक्षातील, प्रभागातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना कळवावे अशी सूचना शिवसेना ठाकरे गटाकडून सांगण्यात आली आहे.
(राजकारणातील महत्वाच्या बातम्यांच्या अपडेटस॒साठी सरकारनामाचे अधिकृत WhatsAppचॅनेल फॉलो करा)
उमेदवारांना प्रचारासाठी आता अवघे 5 दिवस राहिले आहेत. त्यामुळे कल्याण लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार वैशाली दरेकर यांच्यासाठी पक्ष प्रमुखांची रद्द झालेली सभा पुन्हा कधी होते यावर चर्चा सुरू झाली आहे.
Edited By : Umesh Bambare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.