Kalyan Loksabha : 'लढण्याची वेळ तेव्हा पळून गेले', श्रीकांत शिंदेंनी उडवली आदित्य ठाकरेंची खिल्ली

Loksabha Election : श्रीकांत शिंदे म्हणाले, मनसे आणि शिवसेनेचा डीएनए एकच आहे. राज ठाकरेंनी महायुतीला पाठींबा दिला तेव्हा पासून राज ठाकरेंचा प्रत्येक कार्यकर्ता जोरात प्रचार करतात
aaditya thackeray shrikant shinde
aaditya thackeray shrikant shindesarkarnama
Published on
Updated on

Loksabha Election : कल्याण लोकसभेचे उमेदवार डाॅ.श्रीकांत शिंदे आणि ठाणे लोकसभेचे उमेदवार नरेंद्र म्हस्के यांच्यासाठी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी जाहीर सभा घेतली. या सभेत राज यांनी महाविकास आघाडीसह उद्धव ठाकरेंवर प्रखर शब्दांत तोफ डागली. राज ठाकरे यांच्या आधी श्रीकांत शिंदे shrikant shinde यांनी नाव न घेता आदित्य ठाकरे यांची खिल्ली उडवली.

aaditya thackeray shrikant shinde
Raj Thackeray Sabha : शरद पवारांनी राज्यात पहिल्यांदा फोडाफोडीचे राजकारण केलं; राज ठाकरेंनी सगळंच काढलं

कल्याण लोकसभा Kalyan Loksabha मतदारसंघातून श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात आदित्य ठाकरे किंवा वरूण सरदेसाई लढतील, अशी चर्चा होती. मात्र, वैशाली दरेकर Vaishali Darekar यांनी श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात ठाकरे गटाकडून निवडूण रिंगणात उतरवण्यात आले त्यावरून श्रीकांत शिंदे यांनी आपल्या भाषणात आदित्य ठाकरे यांचे नाव न घेता लढण्याची वेळ आली तेव्हा पळून गेले, अशी खिल्ली उडवली.

श्रीकांत शिंदे म्हणाले, मनसे आणि शिवसेनेचा डीएनए एकच आहे. राज ठाकरेंनी महायुतीला पाठींबा दिला तेव्हा पासून राज ठाकरेंचा प्रत्येक कार्यकर्ता जोरात प्रचार करतात. उमेदवार आपल्याच पक्षाचा आहे तसे समजून ते काम करतायेत. मतदारसंघामध्ये कोट्यावधीचा निधी आणून विकासकामे केली. 2014 आणि 2024 मधील मतदारसंघामध्ये तुम्हाला फरक दिसेल.

'राजसाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद घेण्यासाठी मी गेले होतो. तेव्हा त्यांना प्रचाराला येण्याची विनंती केली. त्यांनी तत्काळ ते येणार असल्याचे कबूल केलं. त्यांनी त्यांच वाक्य खरं करून दाखवलं. मी त्यांचे आभार मानतो. कार्यकर्ता कुठल्याही पक्षाचा असो टीव्हीवर राज ठाकरेंचे भाषण ऐकतो. राज ठाकरे साहेबांच्या शहराच्या विकासाची ब्लूप्रिंट मांडली. आम्ही त्यांच्याच मार्गावर चालण्याचा प्रयत्न करतो, असे ठाकरे म्हणाले.

aaditya thackeray shrikant shinde
Pune Loksabha Election : मतदान केंद्राच्या 100 मीटर परिसरात मोबाईल बंदी, प्रतिबंधात्मक आदेश

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com