- विनायक पवार
Tarapur Bribe Case: तारापूर ग्रामपंचायतीच्या भ्रष्ट महिला सरपंच संध्या संजय पागधरे हिला ४ हजार रुपयांची लाच स्वीकारताना पालघर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात अटक केली आहे. व्यवसाय सुरु करून स्वतःच्या पायावर उभे राहू इच्छिणाऱ्या स्थानिक तरुणांकडून ही लाच घेतल्याचे लाजिरवाणी कृत्य या महिला सरपंचनं केलं आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार व त्यांच्या बहिणीला डाय मेकिंगचा व्यवसाय सुरू करण्यासाठी बँकेकडून कर्ज मंजुरी प्रक्रियेसाठी ग्रामपंचायतीचे ना हरकत प्रमाणपत्र (NOC) आवश्यक होते. हे प्रमाणपत्र देण्यासाठी संबंधित सरपंचांनी सुरुवातीला ५ हजार रुपयांची लाच मागितल्याचे समोर आले आहे. त्यानंतर झालेल्या तडजोडीनुसार १ हजार रुपये ग्रामपंचायतीच्या पावतीसाठी तर ४ हजार रुपये स्वतःसाठी स्वीकारण्याचे ठरविण्यात आले होते.
दरम्यान, तक्रारदाराने याबाबत पालघर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार १३ मे रोजी ग्रामपंचायत कार्यालयात सापळा रचण्यात आला. यावेळी ४ हजार रुपयांची लाच स्वीकारताना महिला सरपंच संध्या संजय पागधरे यांना दुपारच्या सुमारास रंगेहात पकडण्यात आले. याप्रकरणी तारापूर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पालघर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक दादाराम करांडे करत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.