

Gujarat Election: राजकारण आणि क्रिकेट याच कनेक्शन काही लपून राहिलेलं नाही. भारतात या दोन क्षेत्रांची युती हा कायम चर्चेचा विषय राहिला आहे. यामध्ये राजकीय क्षेत्र हे सर्वांसाठीच खुलं असल्यानं अनेक क्रिकेटपटू किंवा त्यांचे कुटुंबिय हे राजकीय क्षेत्राशी जोडलेले पाहायला मिळतात. असंच एक कुटुंब सध्या चर्चेत आहे, यामध्ये एका क्रिकेटपटूची पत्नी ही भाजपची आमदार आहे तर बहीण काँग्रेसमध्ये कार्यरत असून या पक्षाकडून आता निवडणूक लढवणार आहे.
भारतीय क्रिकेटपटू रविंद्र जडेजा हा आपल्या कुटुंबाच्या राजकीय वावरामुळं चर्चेत आला आहे. जडेजाची पत्नी रिवाबा जडेजा या गुजरातच्या मंत्री आहेत. भाजपकडून त्यांनी पहिल्यांदा २०२२ मध्ये जामनगर उत्तर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकली. त्यानंतर २०२५ मध्ये त्यांना गुजरातच्या भुपेंद्र पटेल मंत्रीमंडळात राज्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी देण्यात आली आहे.
दुसरीकडं रविंद्र जडेजा याची बहीण नयनबा जडेजा या गेल्या अनेक वर्षांपासन काँग्रेसच्या कार्यकर्ता म्हणून काम करत आहेत. आता त्या राजकोट स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत त्या उतरल्या असून पहिल्यांदाच नगरसेवकपदासाठी त्यांनी काँग्रेसकडून अर्ज दाखल केला आहे. यावर बोलताना त्यांनी सांगितलं की, "राजकारणाची तर मला खूप पुर्वीपासूनच आवड आहे. मी समाजसेवेच्या कार्यतही आहे, पण तुम्हालाही माहिती आहेच की समाजसेवा करत असताना त्याला जर राजकारणाची जोड असणं गरजेचं आहे. बराच काळ झाला मी ८-९ वर्षे काँग्रेसमध्ये काम करत आहे, याकाळात मला खूप काही शिकायला मिळालं आहे. त्यामुळं मी आता इतकी परिपक्व झाली आहे की मला आता निवडणूक लढवणं गरजेचं आहे. तसंच मी काँग्रेसची कार्यकर्ता म्हणून खूप काम केलेलं आहे, हे पक्षाला देखील ठावूक आहे"
दरम्यान, वहिणी भाजपच्या मंत्री आहेत आणि आपण काँग्रेसमध्ये आहोत यावर बोलताना नयनबा जडेजा म्हणाल्या की, हे तुमच्या विचारधारेवर निर्भर करत की तुम्ही कुठल्या पक्षात जावं, कारण माझी विचारधारा ही काँग्रेसी विचारधारा आहे, तर भाजपहा शोषणकर्ता पक्ष आहे. या पक्षालो जनतेच्या दुःख, त्रास याच्याशी काहीही देणंघेण नाही. पण मी काँग्रेसकडून हे शिकले आहे की जर तुम्ही लोकांमध्ये जाऊन काम केलं तर लोक तुम्हाला ओळखतील. त्यानुसारच मी काम कर असून पक्षानं मला उमेदवारी देऊन माझ्यावर विश्वास दाखवला ही मोठी गोष्ट आहे, असंही रविंद्र जडेजाच्या भगिनी नयनबा जडेजा यांनी म्हटलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.