Shivsena  Sarkarnama
ठाणे

निवडणूकीपुर्वी आघाडीत ठिणगी : शिवसेना सोयीचे वॉर्ड तयार करत असल्याचा दावा

शिवसेना आणि राष्ट्रावादीमध्ये ठिणगी पडण्याची शक्यता

सरकारनामा ब्युरो

ठाणे : ऐन स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिका निवडणूकीच्या तोंडावर आघाडीत ठिणगी पडली आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी शिवसेनेवर वार्ड रचनेच्या बाबतीत गंभीर आरोप केला आहे. ठाणे महानगरपालिकेच्या निवडणूकीत शिवसेना आपल्याला हवे तसे वॉर्ड तयार करते, असा आरोप आव्हाड यांनी केला आहे. या आरोपांमुळे शिवसेना आणि राष्ट्रावादीमध्ये ठिणगी पडण्याची शक्यता आहे.

ठाण्यातील एका कार्यक्रमात बोलताना आव्हाड म्हणाले, वॉर्ड रचनेचे काम स्वतंत्ररित्या निवडणूक आयोगानेच करावे आणि त्यांनीच मॅपही जारी करावा. इथून कच्चा माल पाठवायचा आणि मग आम्ही पक्का करु, हे होत नसते. काही तुम्ही पक्का वगैरे करत नसता. जसा आलाय तसा प्रिंट कराल आणि पब्लिश करायचा, हे आम्ही मागच्या वेळी ठाणे महापालिकेच्या निवडणूकीत बघितले आहे. तेव्हा आम्ही आणि शिवसेना एकत्र नव्हतो पण शिवसेना स्वतःला हवे तसे वॉर्ड ठाणे महापालकेच्या निवडणूकीत पाडून घेते हे आम्ही स्वतःच्या डोळ्यांनी बघितले आहे.

ओबीसी आरक्षणामुळे निवडणूका पुढे जाण्याची शक्यता

स्थानिक स्वराज्य संस्थांत ओबीसी आरक्षणाचा (OBC Reservation) महाराष्ट्र शासनाचा (State Government) अध्यादेश सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) सोमवारी (६ डिसेंबर) रद्द केला. त्यामुळे एका बाजूला महापालिकातील बहूसदस्यीय प्रभाग पद्धतीला मुंबई उच्च न्यायालयात दिलेले आव्हान आणि आता रद्द झालेला अध्यादेश यामुळे राज्यातील सर्व महापालिकांच्या निवडणुकीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यातून ही निवडणूक पुढे जाण्याची शक्यता आता आणखी वाढली आहे.

सत्ताधारी व विरोधक अशा दोघांनाही ओबीसी आरक्षणाविना ही निव़़डणूक नको आहे. तर, ओबीसी आरक्षणाच्या जागा वगळून सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक घेण्यात सांगितले आहे. त्यानुसार ती झाली, तर ओबीसी उमेदवारांची मोठी गोची होणार आहे. हक्काचे मतदारसंघ नसल्याने कोठून व कसे लढायचे हा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT