Thane Political News  Sarkarnama
ठाणे

Thane Political News : शिंदेंच्या बालेकिल्ल्यात भाजपचं 'घर घर मोदी' ; संघर्ष उफाळणार?

Eknath Shinde News : शिंदेंच्या ठाण्यात भाजप अँक्टिव्हेट..

Pankaj Rodekar

Thane News : अयोध्यानगरीतील रामलल्लामूर्ती प्राणप्रतिष्ठापणा सोहळ्याने भाजपने जणू लोकसभा निवडणुकीचा नारळच फोडला, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. यातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात भाजप नवनवीन उपक्रम हाती घेताना दिसत आहे.

यातच आता भाजपच्या वतीने 'घर घर मोदी' अभियानाद्वारे तळागाळातील प्रत्येक मतदारापर्यंत मोदी सरकारचे 10 वर्षातील प्रभावी कार्य, मागच्या जाहीरनाम्यातील आश्वासनांची केलेली पूर्ती, विकसित भारताचा संकल्प सांगणाऱ्या यंदाच्या अंतरिम अर्थसंकल्पातील ठळक तरतुदी आदी सर्व माहिती मतदारांपर्यंत पोचविण्यात येईल, तसेच मोदीजींची गॅरंटी काय आहे? हे प्रत्येक नागरिकाला माहितीपत्राद्वारे सांगण्यात येणार आहे. हे अभियान म्हणजे आगामी लोकसभेची तयारी असल्याचे म्हटले जात आहे. (Latest Marathi News)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारला दहा वर्षांची कामगिरी पूर्ण झाली असून, सरकारने विविध क्षेत्रात दमदार कामगिरी केली. त्यात गेल्या दीड वर्षांपासून राज्यातील महायुती सरकारनेही महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेले आहे. केंद्र व राज्य सरकारच्या योजना शहरातील प्रत्येक बूथवरील लाभार्थीपर्यंत पोहोचविण्यासाठी अभियान हाती घेण्यात आले आहे.

या अभियानाला (4 फेब्रुवारी) आजपासून सुरूवात होणार असून, ते पंडित दिनदयाळ उपाध्याय यांच्या (11 फेब्रुवारी) स्मृतीदिनापर्यंत सुरू राहणार आहे. हे अभियान पंडित दिनदयाळ यांच्या स्मृतींना समर्पित केले जाणार आहे. विशेष म्हणजे या अभियानात पक्षाचे शहरातील माजी खासदार, आमदार, माजी नगरसेवक, जिल्हापदाधिकारी, प्रकोष्टचे संयोजक, वॉरियर्स, प्रदेश कार्यकारिणी सदस्य, मंडल अध्यक्ष आदी मंडळी प्रामुख्याने सहभागी होणार आहेत, तर या अभियानात सहभागी कार्यकर्त्यांना 'प्रवासी कार्यकर्ता' म्हणून संबोधण्यात येणार आहे.

दरम्यान, शहरातील एक हजार मतदारांच्या बूथवरील लाभार्थीपर्यंत पोहोचण्याचो याचे उद्दीष्ट आहे. तळागाळातील प्रत्येक मतदारापर्यंत मोदी सरकारचे 10 वर्षातील प्रभावी कार्य, मागच्या जाहीरनाम्यातील आश्वासनांची केलेली पूर्ती, विकसित भारताचा संकल्प सांगणाऱ्या यंदाच्या अंतरिम अर्थसंकल्पातील ठळक तरतुदी आदी सर्व माहिती मतदारांपर्यंत पोचविण्यात येईल. तसेच मोदीजींची गॅरंटी काय आहे? हे प्रत्येक नागरिकाला माहितीपत्राद्वारे दिली जाणार असल्याचे ठाणे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांनी सांगितले. या अभियानावरून भाजपने दंड थोपले असून शिंदेंच्या बालेकिल्ला काबीज करण्याचा हा प्रयत्न असल्याचे दिसत आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT