RAY Nagar : पंतप्रधान नरेंद्र मोदी सोलापुरात दाखल; कामगारांना १५ हजार घरांचे होणार वाटप

Modi Arrived In Solapur : पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते या गृहनिर्माण प्रकल्पाचे भूमिपूजन ९ जानेवारी २०१९ रोजी झाले होते.
Narendra Modi
Narendra Modi Sarkarnama
Published on
Updated on

Solapur News : सोलापूरच्या कुंभारीच्या रे नगर येथील गृहनिर्माण प्रकल्पाच्या लोकार्पण सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोलापुरात दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मोदी यांचे कुंभारी येथील रे नगर येथील हेलिपॅडवर मोदी यांचे स्वागत केले. (Prime Minister Narendra Modi arrived in Solapur)

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांच्या संकल्पनेतून कुंभारी येथील रे नगर येथे असंघटीत कामगारांसाठी पहिल्या टप्प्यात तब्बल १५ हजार घरे बांधून पूर्ण झाली आहेत. त्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. त्यासाठी आज मोदी सोलापुरात दाखल झाले आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Narendra Modi
RAY Nagar : पंतप्रधान मोदींच्या हस्ते 'या' पाच कामगारांना मिळणार घराच्या चाव्या!

पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते आशिया खंडातील सर्वात मोठ्या कामगार वसाहतीचे उद्‌घाटन आज होणार आहे. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते या गृहनिर्माण प्रकल्पाचे भूमिपूजन ९ जानेवारी २०१९ रोजी झाले होते. त्याच कार्यक्रमात मोदी यांनी या गृहनिर्माण प्रकल्पाच्या उद्‌घाटनासाठी मीच पुन्हा येईन, असे त्यांनी म्हटले होते. त्यानुसार पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते घरांचे लोकार्पण होणार आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पाच लाभार्थींना प्रातिनिधीक स्वरूपात घरांच्या चाव्या देण्यात येणार आहेत. त्यामध्ये सुनीता मूदयप्पा जगले, लता विजय दासरी, रिझवाना लालमोहम्मद मकानदार, बाळूबाई सुनील वाघमोडे आणि लता मनोहर आडम या पाच महिला कामगारांचा समावेश आहे. या पाच कामगारांना पंतप्रधानांच्या हस्ते घराच्या चाव्या देण्यात येणार आहेत.

Narendra Modi
Ray Nagar : असंघटित कामगारांच्या घरांची स्वप्नपूर्ती : रे नगर

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com