Thane Corporation : तिजोरीत खडखडाट असताना ठाणे पालिका 'या' कामासाठी करणार कोट्यवधींचा खर्च

Thane Corporation News : ठाण्यात भाजपा आणि शिंदे गटात सुरू असलेला वादंग थोपाविण्यासाठी पालिका प्रशासनानं 'हा' निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे.
Thane Municipal Corporation
Thane Municipal CorporationSarkarnama
Published on
Updated on

ठाणे : अनधिकृत बांधकामे किती काही केले तरी थांबायचे नाव घेत नाही. ही बांधकामे राजकीय वरदहस्त असल्याशिवाय होऊ शकत नाही. त्यातच अनधिकृत बांधकामावर कारवाई करताना पुरेसा पोलीस बंदोबस्त ही उपलब्ध होत नाही. म्हणून ठाणे महापालिका प्रशासनाने आता महाराष्ट्र सुरक्षा बोर्डाचे जवान उपलब्ध करुन घेण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भातील प्रस्ताव नुकत्यात झालेल्या प्रशासकीय महासभेत मंजुर करताना, महापालिका 2024-25 या आर्थिक वर्षासाठी तब्बल तीन कोटी 52 लाख 32 हजारांचा खर्च करण्याची तयार केली आहे.

Thane Municipal Corporation
Manoj Jarange Patil: फडणवीसांच्या 'होम डिपार्टमेंट'चा जरांगेंबाबत मोठा निर्णय; सुरक्षेसाठी 24 तास...

एकीकडे महापालिकेची तिजोरी रिकामी होत असताना, हा अतिरिक्त खर्च करण्याचा घाट नेमका कशासाठी? तसेच हा खर्च करून ती बांधकामे जमीनदोस्त होतील. पण, पुन्हा नव्याने बांधकामे उभी राहिल्यास त्याला जबाबदार कोण? यासारखे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यामुळे ठाणेकर नागरिकांनी कर रुपी दिलेल्या पैशाचा योग्य विनियोग करावा, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. तसेच, राजकीय वादंग सुरू असल्याने हा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे. ( Thane Municipal Corporation News )

राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा! )

Thane Municipal Corporation
Thackeray Group News : ठाकरेंनी कुदळ मारलेल्या प्रकल्पांचं उद्घाटन मोदींच्या हस्ते!

अनधिकृत बांधकामाचा मुद्दा विधानसभा अधिवेशनात गाजला. यानंतर ठाणे महापालिका प्रशासनाने नव्या वर्षात अनधिकृत बांधकामाविरोधात विशेष मोहीम हाती घेतली. ही मोहीम 14 जानेवारीला सुरू झाली असून ती येत्या 14 फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे. परंतु, ही कारवाई करताना मनुष्यबळ कमी पडत आहे. त्यामुळे महापालिकेनं आता सुरूवातीला 100 आणि त्यात आणखी 4 असे 104 महाराष्ट्र सुरक्षा बोर्डाचे सुरक्षा रक्षक घेण्याचे निश्चित केले आहे. बोर्डाने देखील अतिरिक्त सुरक्षा पर्यवेक्षक व सुरक्षा रक्षक उपलब्ध करुन देण्यास सहमती दर्शविली आहे. त्यासाठी तीन महिन्यांसाठी 1 कोटी 76 लाख 16 हजारांचा खर्च प्रस्तावित करण्यात आला आहे. परंतु, या वेतनाची अर्थसंकल्पीय तरतूद उपलब्ध नसल्याने ती उपलब्ध करुन देण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. दुसरीकडे 2024-25 या आर्थिक वर्षात यासाठी 3 कोटी 52 लाख 32 हजार इतकी रक्कम अपेक्षित धरण्यात आली आहे. ती तरतूद तत्काळ उपलब्ध करुन देण्यास आयुक्तांनी मान्यता दिली आहे.

सद्यस्थितीत ठाण्यात भाजप आणि शिवसेना शिंदे गटात अनधिकृत बांधकामांवरून जो वादंग सुरू आहे. तो वादंग थोपविण्यासाठी महापालिका प्रशासनाने ही पाऊले उचल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. पण, यामुळे ठाणेकरांचा कर रुपी पैसा सदकामी लागत नसल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे.

Edited By : Akshay Sabale

Thane Municipal Corporation
MP Amol Kolhe : 'भारताची कांदा निर्यातबंदी पाकिस्तानच्या फायद्याची; आपल्या शेतकऱ्यांचे 2 हजार कोटींचे नुकसान'

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com