Thane News : एका बाजूला मराठी भाषा अभिजात झाली आहे. राज्य सरकार मराठी भाषा संवर्धन आणि वाढीसाठी प्रयत्न करत आहे. आज (27 फेब्रुवारी) मराठी भाषा गौरव दिवसही अत्यंत उत्साहात साजरा झाला. त्याचवेळी दुसऱ्या बाजूला ठाणे महानगरपालिका प्रशासनाने मराठी भाषा गौरव दिनाच्या पूर्वसंध्येलाच मराठीमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या कर्मचाऱ्यांचा प्रोत्साहन भत्ता रद्द केला आहे. या निर्णयांमुळे फटका बसलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
आठ वर्षांपूर्वी महापालिकेचे तत्कालीन सभागृह नेते आणि विद्यमान खासदार नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी महापालिकेच्या आस्थापनेवरील अधिकारी, कर्मचारी मराठीतून डीएमजीएफएम, एलएसजीडी, एम.ए. व तत्सम अभ्यासक्रम पूर्ण करतील त्यांना अतिरिक्त वेतनवाढ देण्याचा प्रस्वाव मांडला होता. सर्वसाधारण सभेने त्यावेळेस मंजुरी दिली होती.
मात्र आता अचानक अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी एक परिपत्रक जारी केले आहे. यामध्ये मराठीतून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेल्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या वेतनवाढीवर घाला घातला आहे. डीएमजीएफएम, एलएसजीडी, एलजीएस, एमए(मराठी) आणि तत्सम अभ्यासक्रम पुर्ण करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अतिरिक्त वेतनवाढ देता येणार नसल्याचे या परिपत्रकात म्हटले आहे.
ठाणे (Thane) महानगरपालिकेत सातवा वेतन आयोग लागू झाला आहे. यानुसार, शिक्षणावर आधारीत अतिरिक्त वेतनवाढी देय असण्याबाबत शासन निर्देश अद्याप प्राप्त झालेला नाही. यामुळे डीएमजीएफएम, एलएसजीडी, एलजीएस, एमए(मराठी) आणि तत्सम अभ्यासक्रमासाठी दिली जाणारी अतिरिक्त वेतनवाढीबाबत प्रशासनाने अंतिम निर्णय सत्वर घेणे आवश्यक असल्याचे निरिक्षण मुख्य लेखा परिक्षकांनी नोंदविले आहेत. त्या अनुषंगाने पडताळणी करून यापुढे अशा प्रकारचे शिक्षण घेणाऱ्यांना अतिरिक्त वेतनवाढ देता येणार नाही, असे या परिपत्रकामध्ये म्हंटले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.