Amol Mitkari sarakrnaama
अकोला

Amol Mitkari : सहाच महिन्यांत अमोल मिटकरींची राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या मुख्य प्रवक्ते पदावरून उचलबांगडी!

Political News : सहा महिन्यांतच काढलं मुख्य प्रवक्ते पद

जयेश विनायकराव गावंडे

Akola News : आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वीच विविध राजकीय पक्षांनी फेरबदल करण्यास सुरुवात केली आहे. या फेरबदलाचा मोठा फटका आमदार अमोल मिटकरी यांना बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांना त्यांच्या पक्षाने दणका दिला आहे. त्यांचं मुख्य प्रवक्तेपद अवघ्या सहा महिन्यांच्या आत काढून घेण्यात आले आहे. त्यांच्या जागी उमेश पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

समाज माध्यमातून वेगवेगळी वक्तव्य करून नेहमी चर्चेत राहण्याचा प्रयत्न करणारे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे विधान परिषद सदस्य अमोल मिटकरी यांचं पक्षाने मुख्य प्रवक्ते पद काढून घेण्याची कारवाई केली आहे. सहा महिन्यांपूर्वी त्यांची नियुक्ती करण्यात आली होती मात्र सहाच महिन्यात त्यांना पदावरून काढण्यात आल्याने राजकीय वर्तुळात याची चर्चा होऊ लागली आहे. दरम्यान आमदार अमोल मिटकरी यांच्या जागेवर उमेश पाटील यांना नियुक्ती देण्यात आली आहे.

आमदार अमोल मिटकरी यांचं पद काढून घेण्यात आल्याने त्यांना गच्छंती की नवीन पद हे पाहावे लागणार आहे. तूर्तास या पदावर काढण्यात आल्याने चर्चांना उधाण आले आहे. शिंदे फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत अमोल मिटकरी यांची मुख्य प्रवक्तेपदी निवड करत असल्याची घोषणा केली होती. मात्र त्याला सहा महिने पूर्ण होण्याच्या आधीच हे पद काढून घेण्यात आलं आहे.

आमदार अमोल मिटकरी हे माध्यमातून वेगवेगळी वक्तव्य करून कायम चर्चेत राहण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या काही वक्तव्यामुळे बरेचदा वाद ही होतात. सत्तेत सहभागी होण्यापूर्वी त्यांनी भाजपवर अनेकवेळा तोंडसुख घेतले होते. त्यामुळे याची चर्चा सत्तेत सहभागी झाल्यानंतर झाली होती. त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे भाजपच्या अनेक पदाधिकाऱ्यांचा आमदार मिटकरी यांना सत्तेत सहभागी झाल्यानंतर देखील विरोध कायम होता. आता पक्षाने मुख्य प्रवक्ते पदच काढून घेतल्यानं पुढे त्यांना जबाबदारी मिळते का हे पाहावं लागणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

उमेश पाटील यांचे केले अभिनंदन

दरम्यान, निर्णयानंतर आमदार अमोल मिटकरी (Amol mitkari) यांनी माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, पक्षाचे एकूण सात प्रवक्ते असून उमेश पाटील (Umesh patil) हे आता मुख्य प्रवक्ते आहेत. मुख्य प्रवक्ता हा मुंबईत राहणारा असावा, मी अकोल्यात राहतो. त्यामुळे पक्षाची योग्य तो समन्वय साधता येत नाही. त्यामुळे हा निर्णय घेतला आहे. मुख्य प्रवक्तेपदी निवड झाल्याबद्दल उमेश पाटील यांचे त्यांनी अभिनंदन केलं आहे.

(Edited By Sachin waghmare)

SCROLL FOR NEXT