Amol Mitkari : "राऊतांची अवस्था पोपटासारखी..."; खेळण्यातला पोपट दाखवून मिटकरींनी उडवली खिल्ली

Maharashtra Political News : संजय राऊत यांच्यासह अमोल कोल्हे यांच्यावरही डागली तोफ!
Amol Mitkari
Amol MitkariSarkarnama

Akola News : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुण्यात शेतकरी आक्रोश मोर्चाच्या समारोपाच्या कार्यक्रमात भाजप आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला. दरम्यान, राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी खासदार राऊत आणि अमोल कोल्हे यांच्यावर टीकास्त्र डागले आहे. तर राऊत यांची अवस्था पोपटासारखी झाली असल्याचा आरोप करत खेळण्यातला पोपट दाखवून खिल्ली उडवली आहे.

शेतकरी आक्रोश मोर्चा दरम्यान शनिवारी (ता.30) शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका करतांना त्यांची मिमिक्री करत निशाणा साधला. “आमच्या पाडापाडीत तुम्ही पडू नका, हवा तेज है, अजितराव टोपी उड जाएगी”, असा टोला राऊतांनी लगावला. तर खासदार अमोल कोल्हे यांनीही अजित पवार यांच्यावर पुन्हा टीकास्त्र डागले.

Amol Mitkari
Sanjay Raut On Seat Allocation : 'जिंकेल त्याची जागा', संजय राऊतांनी सांगितले जागावाटपाचे सूत्र !

दरम्यान, आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनीही या दोघांवर टीका करत खासदार संजय राऊत यांना पोपटाची उपमा दिली आहे. ते म्हणाले, संजय राऊत यांची अवस्था पोपटासारखी झाली असून दोघेही खासदार पायाला भिंगरी लावून फिरत आहेत. ते अजित पवार यांच्यामुळे, कोल्हेंनी आपला पक्ष का सोडला हा प्रश्न स्वतः ला विचारा ते आमच्या पक्षात आले आणि आमच्या पक्षात आल्यानंतर अजित पवारांच्या शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार झाले आणि आज काहीतरी लोकांना मनोरंजन करण्यासाठी ज्या काही तुमच्या शाळा भरवल्या जात आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

यावर महाराष्ट्राची जनता लक्ष ठेवून आहे. तुमच्या दिल्लीश्वराला मी समजू शकतो तुम्ही सर्वांचा नाद करा पण अजित पवारांचा नाद करू नका असा सल्ला वजा इशारा आमदार अमोल मिटकरी यांनी खासदार संजय राऊत आणि खासदार अमोल कोल्हे यांना दिला आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Amol Mitkari
Narendra Modi News : 'भाजपचा वारू आता कोणी रोखू शकत नाही', कोणी केला हा दावा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com