Latur Congress : शेतकऱ्यांचा ऊस फडातच; देशमुख काका-पुतण्याने गाळपासाठी सूत्रं हलवली...

Dilip Deshmukh and Amit Deshmukh : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ऊस उत्पादक शेतकरी नाराज होणे परवडणार नाही.
Latur Congress
Latur CongressSarkarnama

राम काळगे

Sugarcane of Latur District Farmers : लातूर जिल्ह्यातील सर्वच कारखाने सुरू झाले असले, तरी अजूनही मोठ्या प्रमाणात ऊस फडामध्ये गाळपाच्या प्रतीक्षेत उभा आहे. तोडणीचा कालावधी उलटून 14 महीने होत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. यातच पाणीटंचाईच्या झळामुळे उत्पन्नावर मोठा परिणाम होत आहे. या पार्श्वभूमीवर काका-पुतण्या म्हणजेच माजी मंत्री दिलीपराव देशमुख आणि आमदार अमित देशमुख यांनी ऊस उत्पादकांची ही अडचण सोडवण्यासाठी पुढाकार घेतल्याचे दिसत आहे .

साखर कारखान्यांची यंत्रणा वाढवून ऊसाचे वेळेवर गाळप करण्याच्या हेतून या काका-पुतण्यांनी सुत्रे हलवली आहेत. लातूर जिल्ह्यात मांजराच्या माध्यमातून सहकार क्षेत्रावर आपली पकड मजबूत ठेवण्याचा कायम प्रयत्न असतो. देशमुख कुटुंबाचे राजकारणही मांजरा आणि जिल्हा बॅंकेच्या माध्यमातून चालते असेही बोलले जाते. त्यामुळे ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ऊस उत्पादक शेतकरी नाराज होणे परवडणार नाही, हे लक्षात घेऊन ऊसाचे संपूर्ण गाळप वेळेत पूर्ण करण्यासाठी देशमुखांनी यंत्रणा उभी करण्याचा निर्णय घेतल्याचे दिसते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Latur Congress
Raju Shetti News : नार्वेकरांनी दिलेल्या निकालावर राजू शेट्टी म्हणाले, 'जरा वेश बदलून लोकांमध्ये जा...'

विशेष म्हणजे तशा सूचना त्यांनी संबंधितांना केल्या असून त्यामुळे शेतकऱ्यांचा फडातील ऊस फडाबाहेर निघून लवकरच कारखान्यांमध्ये गाळपासाठी जाण्याची आशा निर्माण झाली आहे. मांजरा साखर कारखाना परिवारातील यावर्षीचा सर्वच कारखान्यांचा गळीत हंगाम अधिक क्षमतेने चालविण्यासाठी तयारी केली आहे. यासाठी लागणारी आवश्यक तोडणी, वाहतूक यंत्रणाही सज्ज करण्यात आली आहे.

यावर्षी पावसाचे प्रमाण कमी होते, त्यामुळे ऊसाची अपेक्षित वाढ झाली नाही. एकरी कमी उत्पादकतेचा अंदाजही व्यक्त केला जात होता. मात्र नोव्हेबर-डिंसेबर 2023 नंतर परतीचा पाऊस पडला. या पावसाचा ऊसाला फायदा झाला आणि एकरी उत्पादनही वाढले आहे.

पण याकाळातील अवकाळी पावसामुळे काही काळ गळीत हंगामामध्ये व्यत्यय आला. सध्या हंगाम गतीने सुरू असला तरी सगळा ऊस गाळप करण्यासाठी कारखाना पूर्ण क्षमतेने चालवणारी यंत्रणा कार्यन्वित करावी लागणार आहे. ती उभारण्याच्या सूचना दिलीप देशमुख, अमित देशमुख(Amit Deshmukh) यांनी कारखाना प्रशासनाला दिल्या आहेत. दुप्पट कार्यक्षमता वाढवून वेळेत शेतकऱ्यांच्या सगळ्या ऊसाचे गाळप करण्याचे मोठे आव्हान आता या कारखान्यासमोर असणार आहे. लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख यांनी गळीत हंगामाची वाटचाल आणि ऊसतोडणी कार्यक्रमाचा नुकताच आढावा घेतला.

Latur Congress
Nanded Loksabha Constituency : मीनल खतगावकर लोकसभेसाठी तयार.. पण साहेबांनी आदेश दिला तरच..!

लातूर, रेणापूर, औसा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या ऊसाचे वेळेवर गाळप व्हावे, या अनुषंगाने मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना, विलास सहकारी साखर कारखाना, रेणा सहकारी साखर कारखानाच्या ऊसतोडणी व ऊसवाहतूक यंत्रणेची आणि सुरू असलेल्या गळीत हंगामाची माहितीही त्यांनी घेतली.

जानेवारी महिना सुरू असून पाण्याचे दुर्भिक्ष, वाढते ऊन यामुळे सभासद आणि ऊस उत्पादक आपला ऊस लवकर जाण्यासाठी कारखान्याकडे मागणी करीत आहेत. अधिक यंत्रणा वाढवून ऊसाचे गाळप लवकर करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com