Chandrakant Khaire  Sarkarnama
छत्रपती संभाजीनगर

Chandrakant Khaire : चंद्रकांत खैरे शेवटची निवडणूक हरले, पुढे काय?

Chandrakant Khaire in the Legislative Assembly Arena : लोकसभेतील पराभवानंतर पुढे काय? खैरे मार्गदर्शकाच्या भुमिकेत राहणार? की मग पुन्हा विधानसभेच्या आखाड्यात नशिब आजमावणार? हे येत्या काही महिन्यात स्पष्ट होईल.

Jagdish Pansare

Chandrakant Khaire News : लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) चंद्रकांत खैरे संभाजीनगरमधून पराभूत झाले. सलग दुसरा पराभव झाल्यामुळे आता पुढे काय? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

लोकसभेची उमेदवारी मिळवताना त्यांना पक्षातूनच स्पर्धेला तोंड द्यावे लागले होते. शेवटची निवडणूक म्हणत, प्रचारासाठी त्यांनी याच मुद्यावरून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला. पण मराठा आरक्षणाच्या मुद्यावर मराठवाड्यात झालेल्या एकगठ्ठा मतदानाने खैरे यांची शेवटची निवडणूक जिंकण्याचे स्वप्न भंगले.

विधान परिषेदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उमेदवारीवर दावा केला होता. मातोश्रीवर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासमोर या दोघांमध्ये खडाजंगी झाली तेव्हा खैरेंनी ही माझी शेवटची निवडणूक आहे, असे म्हणत उमेदवारी पदरात पाडून घेतली. निवडणुकीतील पराभवानंतर खैरे यांनी अंबादास दानवेसह काही पदाधिकाऱ्यांनी काम केले नसल्याचा आरोप करत दोघांमधील संबंध अजून ताणलेले असल्याचे दाखवून दिले होते. खैरे-दानवेंच्या भांडणामुळे शिवसेनेची हक्काची जागा गेली, असंही वरिष्ठ नेते बोलू लागले आहेत. शेवटची निवडणूक आहे, असे जाहीर करून खैरे यांची आता फसगत झाली आहे.

लोकसभेतील पराभवानंतर आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने जिल्ह्यात सुरू असलेल्या आढावा बैठकांमध्ये खैरे हजेरी लावत आहेत. अर्थात शिवसेना (Shiv Sena) नेते म्हणून ती त्यांची जबाबदारीच आहे. पण लोकसभेतील पराभवानंतर पुढे काय? खैरे मार्गदर्शकाच्या भुमिकेत राहणार? की मग पुन्हा विधानसभेच्या आखाड्यात नशिब आजमावणार? हे येत्या काही महिन्यात स्पष्ट होईल.

लोकसभेची उमेवारी नाकारल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अंबादास दानवे यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांना शिवसेना नेते पदी बढती दिली होती. जिल्ह्यात खैरे-दानवे असे दोन नेते झाले आहेत. आधीच या दोघांमधून विस्तव जात नाही, त्यात दोघेही नेते, त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीत कोणत्या नेत्याचा आदेश पाळावा, अशी गोची सामान्य शिवसैनिकांची होणार आहे.

लोकसभेतील पराभवामुळे सहाजिकच खैरे बॅकफूटवर गेले आहे. वरिष्ठ नेत्यांचा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन काहीसा बदलल्याची चर्चा आहे. अशावेळी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत खैरे यांची नेमकी काय भूमिका असणार आहे? पक्ष नेतृत्व त्यांच्यावर कोणती जबाबदारी सोपवणार? यावरच खैरे यांचे पुढील राजकीय भविष्य अवलंबून असणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT