Sanjana Jadhav News Sarkarnama
छत्रपती संभाजीनगर

BJP Vs Shivsena : औरंगाबाद जिल्हा बँक निवडणुकीत शिवसेनेला धक्क्यावर धक्के : सत्तारांपाठोपाठ आमदार संजना जाधवही रिंगणातून बाहेर

District Central Bank Election : औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत संजना जाधव यांचा अर्ज बाद झाला. त्यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली असून आता न्यायालयाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Jagdish Pansare

District Bank Election : औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक पदाच्या निवडणुकीत अनेक धक्के बसत आहेत. शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांचे पुत्र समीर सत्तार यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्यानंतर आता कन्नडच्या शिवसेना आमदार आणि भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना जाधव यांचाही उमेदवारी अर्ज बाद ठरवण्यात आला आहे.

संजना जाधव यांनी कन्नड तालुक्यातील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मतदारसंघातून अर्ज दाखल केला होता. सहकारी संस्थेच्या निवडणुकीसाठी संस्थेचा अधिकृत ठराव देऊन प्रतिनिधी नेमने बंधनकारक असल्याने त्यांचा अर्ज ठराव सादर न केल्यामुळे बाद करण्यात आला. त्यांच्यासोबत कन्नड मतदारसंघातील इतर 2 अर्जही याच कारणामुळे बाद झाले आहेत.

अर्ज बाद झाल्यानंतर संजना जाधव यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे. कोर्टाने या प्रकरणी निवडणूक अधिकारी तथा विभागीय सहनिबंधक यांना आदेशासाठी राखून ठेवले आहे. औरंगाबाद खंडपीठ या प्रकरणी निवडणूक अधिकारी यांना काय आदेश देते हे पाहणे महत्वाचे आहे.

औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळात 21 जागांसाठी निवडणूक होत आहे. त्यापैकी 10 जागा कृषी पतसंस्था मतदारसंघासाठी आहेत. कन्नड हा त्यापैकीच एक मतदारसंघ आहे.

कन्नड सोयगाव विधानसभा मतदारसंघातून २०२४ मध्ये शिवसेनेकडून पहिल्यांदाच आमदार झालेल्या संजना जाधव जिल्हा बँक निवडणुकीच्या माध्यमातून सहकार क्षेत्रातही प्रवेश करू पाहत आहेत. त्यांचे वडील माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडून त्यांना राजकीय वारसा लाभलेला आहे. यापूर्वी त्यांनी जिल्हा परिषद सदस्य म्हणूनही काम केलेले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT