MLC election : विधानपरिषद निवडणुकीत भाजपला 2 मतदारसंघात धोक्याची घंटा : अर्ज भरण्यापूर्वीच उमेदवार डेंजर झोनमध्ये

BJP Maharashtra News : महायुतीमधील तीन पक्षात आपसात समन्वय साधून निवडणूक लढवल्यास महायुतीसाठी निवडणूक अवघड नाही. मात्र, काही मतदारसंघात जुना वाद उफाळून आल्यास या निवडणुकीत भाजपला 2 मतदारसंघात धोक्याची घंटा आहे.
eknath shinde Devendra Fadnavis
Jalgaon MLC Election | BJP vs Shinde Sena ClashSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राज्यातील विधानपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने वेगवान घडामोडी घडत आहेत. गेल्या आठ दिवसापासून महायुतीमध्ये जागावाटपाची चर्चा सुरु आहे. मात्र, जागावाटपाबाबत महायुतीमध्ये एकमत होत नसल्याने यावरून दिल्लीत हायकमांडसोबत त्यांची बैठक पार पडली. मात्र, अद्याप समाधानकारक तोडगा निघालेला नाही. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी निवडणूक होत असून या ठिकाणचे संख्याबळ पहिले तर आकडे महायुतीच्या बाजूने दिसत आहेत. मात्र, त्यासाठी महायुतीमधील तीन पक्षात आपसात समन्वय साधून निवडणूक लढवल्यास महायुतीसाठी निवडणूक अवघड नाही. मात्र, काही मतदारसंघात जुना वाद उफाळून आल्यास या निवडणुकीत भाजपला 2 मतदारसंघात धोक्याची घंटा आहे. याठिकाणी अर्ज भरण्यापूर्वीच उमेदवार डेंजर झोनमध्ये आहेत.

राज्यात आगामी काळात निवडणूका होत असलेल्या 17 पैकी तब्बल 14 ठिकाणी भाजपकडे एकहाती बहुमत असल्याचे दिसून येत आहे. शिवसेना (Shivsena) एकाच मतदारसंघात, तर राष्ट्रवादीकडे दोन मतदारसंघात बहुमताचा आकडा आहे. रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात शिवसेनेकडे बहुमत आहे. तर पुणे व परभणी-हिंगोली मतदारसंघात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडे जादुई आकडा आहे. त्यानंतरही जागावाटपात शिवसेनेकडून सहा मतदार संघावर तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून तीन मतदार संघावर दावा सांगितला जात आहे. त्यामुळे उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

eknath shinde Devendra Fadnavis
Maharashtra News Live Update: अमित शाहांसोबतच्या बैठकीनंतर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले,10 लाख टन कांदा...

पुण्यातील जागेवरून भाजप (BJP) व राष्ट्र्वादीत रस्सीखेच आहे. दुसरीकडे नाशिक, छत्रपती संभाजीनगर-जालना मतदारसंघावरून भाजप व शिंदे यांच्या शिवसेनेत चुरस आहे. शुक्रवारी रात्री मुंबईत सीएम देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची बैठक हॊणार असून त्यामध्ये यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे मात्र, नेत्याप्रमाणे कार्यकर्त्यांमध्ये समन्वय नसल्याने भाजपच्या दोन जागा सध्यस्थितीत डेंजर झोनमध्ये दिसत आहेत.

eknath shinde Devendra Fadnavis
Maharashtra News Live Update: अमित शाहांसोबतच्या बैठकीनंतर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले,10 लाख टन कांदा...

राज्यात नुकत्याच झालेल्या स्थानिकच्या निवडणुकीत भाजपची ताकद वाढली आहे. त्यांच्या उमेदवारांच्या विजयाची शक्यता अधिक आहे. त्यामुळे भाजप सहजासहजी कुठलीही जागा सोडणार नाही. विधान परिषदेच्या निवडणुकांवरून महायुतीत मतमतांतर दिसून येत आहेत. जिल्हा परिषदेला भाजपकडून मिळालेल्या वागणुकीवरून शिवसेनेतील नेते, नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी आहे. अनेक जिल्ह्यातील शिवसेना नेत्यांनी घेतलेल्या बैठकांमध्ये आमदार नगरसेवक आणि पदधिकाऱ्यांनी ही नाराजी बोलून दाखवली.

eknath shinde Devendra Fadnavis
MLC Election News : विधानपरिषदेचा धुरळा : शिवसेनेच्या बालेकिल्ल्यावर भाजपचे वर्चस्व; संभाजीनगर-जालना मतदारसंघात कमळ फुलणार?

सातारा, सांगली, सोलापूर, नाशिक, जळगाव, छत्रपती संभाजी नगर आणि रायगडमध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेत जोरदार जुंपली होती. साताऱ्यात तर मंत्री शंभूराज देसाई आणि मकरंद आबा पाटील यांना झालेल्या धक्काबुकीचे पडसाद विधानसभेत उमटले होते. जिल्हा परिषदेला घडलेल्या घटनांची जखम अजूनही भरलेली नसून याचे पडसाद विधान परिषदेच्या निवडणुकांमध्ये उमटू शकतात.

eknath shinde Devendra Fadnavis
MLC election : विधान परिषद निवडणुकीत महायुतीची डोकेदुखी वाढणार!; 'या' दोन जागांवर माविआ भाजपला देणार मोठा झटका? पडद्यामागे तगडी फिल्डिंग!

त्यातच आता शिवसेना नेत्यांकडून जिल्हापातळीवर सुरू असलेल्या बैठकांमध्ये स्थानिक नेत्यांकडून भाजपबाबत नाराजी नोंदवली जात आहे, तसे संकेतही शिवसेना नेत्यांनी दिले आहेत. काही जिल्ह्यांमध्ये स्वतंत्र किंवा भाजपसोडून इतर पक्षांसोबत युती करण्याबाबतची मतेही पदाधिकाऱ्यांनी शिवसेना नेत्यांकडे मांडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

eknath shinde Devendra Fadnavis
Amravati MLC Election : विधानपरिषदेचा धुरळा : अमरावतीत भाजपसाठी धोक्याची घंटा! काँग्रेसने ताकद लावल्यास 'गेम' उलटणार

या मतदारसंघात बसणार फटका?

निवडणुकीच्या तोंडावर अनेक जिल्ह्यांमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) किंवा इतर पक्षांसोबत युती झाल्यास भाजपला काही जागांवर विधान परिषदेला फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वरिष्ठ पातळीवर जरी विधान परिषदेची निवडणुक महायुती म्हणून लढण्याचा निर्णय होत असला तरी जिल्हा पातळीवरील नेत्यांमध्ये खदखद कायम दिसत आहे.

सातारा, सांगली आणि सोलापूर येथील भाजपच्या उमेदवारसमोरील अडचणी शिवसेनेची नाराजी दूर करण्यात यश आले नाहीतर वाढू शकतात. या दोन जागेवर भाजपाला फटका बसण्याची शक्यता आहे. भाजपचे अनेक पालकमंत्री मित्र पक्षातील नेत्यांना सोबत घेऊन चालत नाहीत. अनेक निर्णयांमध्ये मित्र पक्षांना डावलून निर्णय घेतले जात असल्याची खंत सोलापूरातील शिवसेनेच्या कोअर कमिटीत बोलून दाखवण्यात आली. त्यामुळे शिवसेनेची नाराजी समोर आली आहे.

eknath shinde Devendra Fadnavis
MLC Election News : विधानपरिषदेचा धुरळा : शिवसेनेच्या बालेकिल्ल्यावर भाजपचे वर्चस्व; संभाजीनगर-जालना मतदारसंघात कमळ फुलणार?

शिवसेनेचे मंत्री सीएम फडणवीसांना भेटणार

याबाबत शिवसेनेचे मंत्री लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन महायुतीत समन्वय रहावा, याबाबत भाजप नेत्यांना सूचना कराव्यात यासाठी भेट घेणार असल्याचे कळते. तर दुसरीकडे शिवसेनेकडून आता जिल्ह्यातील आमदार, नगरसेवक यांच्या बैठकांचे सत्र सुरू करत नाराजी दूर करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे येत्या काळात डेंजर झोनमध्ये असलेल्या या मतदारसंघासाठी येत्या काळात भाजपकडून कोणती रणनीती अवलंबली जाणार ? याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

eknath shinde Devendra Fadnavis
Yavatmal-Washim MLC election: काँग्रेसने निवडणुकीपूर्वीच शस्त्र टाकली; उमेदवारीसाठीच्या ‘रसद’मुळे विधानपरिषदेच्या मैदानात बॅकफूटवर

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com