Amarinder Singh
Amarinder Singh  
ताज्या बातम्या

अमित शहांच्या भेटीनंतर कॅप्टन थेट पोचले अजित डोवालांच्या घरी

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : पंजाबचे (Punjab) माजी मुख्यमंत्री (Chief Minister) अमरिंदरसिंग हे काँग्रेसला (Congress) धक्का देणार असल्याची चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी दिल्लीत भाजपचे (BJP) नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांची भेट घेतली होती. यामुळे कॅप्टन हे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी शक्यता व्यक्त आहे. या पार्श्वभूमीवर अमरिंदरसिंग यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल (Ajit Doval) यांची भेट घेतल्याने तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

कॅप्टन यांनी काल (ता.29) दिल्लीत अमित शहांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. दोघांच्यात सुमारे तासभर चर्चा झाली होती. नंतर कॅप्टन शहांच्या निवासस्थानातून बाहेर पडले होते. लवकरच कॅप्टन भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी शक्यता व्यक्त होत आहे. त्यांना केंद्रात मंत्रिपद दिले जाईल, अशीही चर्चा सुरू आहे. कृषी मंत्रिपदाची जबाबदारी त्यांच्याकडे दिली जाईल, असेही बोलले जात आहे.

कॅप्टन हे आज आज डोवाल यांच्या घरी पोचले. या भेटीने राजकीय वातावरण तापले आहे. या दोघांच्या भेटीत नेमकी काय चर्चा झाली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. राज्यात राजकीय संकट निर्माण झालेली असताना कॅप्टन यांनी अमित शहा आणि डोवाल यांची घेतलेली भेट महत्वपूर्ण मानली जाते. पंजाब हे सीमावर्ती राज्य असून, या राज्याच्या सुरक्षा अतिशय महत्वाची आहे. त्यामुळे केंद्र सरकारही राज्यातील घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर अमरिंदरसिंग यांनी मनातील खदखद व्यक्त करीत भविष्यात वेगळा निर्णय घेण्याचे संकेत दिले होते. अमरिंदरसिंग म्हणाले होते की, पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी चर्चा केल्यानंतर मी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. अशा प्रकारे आमदारांची बैठक बोलावून माझा अपमान करण्याची ही तिसरी वेळ आहे. ते त्यांच्या विश्वासातील व्यक्तीला आता मुख्यमंत्री नेमू शकतात. काँग्रेस अध्यक्षा जो निर्णय घेतील तो चांगला असेल. मी सध्या तरी काँग्रेससोबत आहे. मी समर्थकांशी चर्चा करुन भविष्यातील निर्णय घेईन.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT