शहांची भेट घेतल्यानंतर तासाभरातच अमरिंदरसिंगांना काँग्रेसचा पहिला दणका

पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची आज भेट घेतली.
Amit Shah and Amarinder Singh
Amit Shah and Amarinder Singh File Photo
Published on
Updated on

नवी दिल्ली : पंजाबचे (Punjab) माजी मुख्यमंत्री (Chief Minister) अमरिंदरसिंग हे काँग्रेसला (Congress) धक्का देणार असल्याची चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आज त्यांनी दिल्लीत भाजपचे (BJP) नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांची भेट घेतली. यामुळे कॅप्टन हे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी शक्यता व्यक्त आहे. दरम्यान, काँग्रेसने त्यांना आता पहिला दणका दिला आहे.

कॅप्टन यांनी आज दिल्लीत अमित शहांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. दोघांच्यात काही काळ चर्चा झाली. नंतर कॅप्टन शहांच्या निवासस्थानातून बाहेर पडले. कॅप्टन काल दुपारी अमृतसरहून दिल्लीला रवाना झाले होते. काल ते दिल्ली विमानतळावर पोचल्यानंतर पत्रकारांनी त्यांना भाजप प्रवेशाबाबत विचारणा केली होती. मी कोणत्याही राजकारणाला भेटायला आलेलो नाही. पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान कपूरथळा हाऊस हे रिकामे करण्यासाठी मी आलो आहे, असे त्यांनी स्पष्टीकरण दिले होते. आता त्यांनी अमित शहांची भेट घेऊन सगळ्यांनाच धक्का दिला आहे.

या भेटीनंतर अमरिंदरसिंगांना पहिला दणका बसला आहे. पंजाब पोलिसांनी तातडीने अमरिंदरसिंग यांच्या पत्नी खासदार प्रणित कौर आणि त्यांचे 19 सल्लागार आणि विशेष अधिकाऱ्यांची सुरक्षा कमी केली आहे. याबाबत पंजाब पोलिसांचे अतिरिक्त पोलीस महांसचालक (सुरक्षा) कार्यालयाने आदेश काढला आहे. या अधिकाऱ्यांच्या सुरक्षेत असलेल्या कर्मचाऱ्यांनी तातडीने दिलेल्या वेळेत कर्तव्यावर पुन्हा हजर राहण्याची तंबी दिली आहे. हे सुरक्षा कर्मचारी हजर न राहिल्यास त्यांच्यावर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.

Amit Shah and Amarinder Singh
अखेर ठरलं! कॅप्टन थेट अमित शहांच्या घरी

लवकरच कॅप्टन भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी शक्यता आहे. त्यांना केंद्रात मंत्रिपद दिले जाईल, अशी चर्चा सुरू आहे. कृषी मंत्रिपदाची जबाबदारी त्यांच्याकडे दिली जाईल, असेही बोलले जात आहे. कारण केंद्र सरकारने आणलेल्या तीन कृषी कायद्यांना सर्वाधिक विरोध पंजाबमधून होत आहे. मुख्यमंत्रिपद गमावलेले कॅप्टन हे काँग्रेसवर नाराज आहेत. राज्यात भाजपचा फारसा प्रभाव नाही. यातच कॅप्टन भाजपमध्ये आल्यास राज्यात विस्तार करण्यास पक्षाला मोठा वाव मिळेल. याचबरोबर त्यांनी केंद्रात कृषी मंत्रिपद दिल्यास पंजाबमधील शेतकऱ्यांच्या विरोधाची धारही काहीशी कमी होईल, असा भाजपचा कयास आहे, असे सूत्रांनी सांगितले.

Amit Shah and Amarinder Singh
दुखणं पंजाबात अन् सिब्बलांनी सांगितला दिल्लीतला जालीम उपाय

मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर अमरिंदरसिंग यांनी मनातील खदखद व्यक्त करीत भविष्यात वेगळा निर्णय घेण्याचे संकेत दिले होते. अमरिंदरसिंग म्हणाले होते की, पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी चर्चा केल्यानंतर मी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. अशा प्रकारे आमदारांची बैठक बोलावून माझा अपमान करण्याची ही तिसरी वेळ आहे. ते त्यांच्या विश्वासातील व्यक्तीला आता मुख्यमंत्री नेमू शकतात. काँग्रेस अध्यक्षा जो निर्णय घेतील तो चांगला असेल. मी सध्या तरी काँग्रेससोबत आहे. मी समर्थकांशी चर्चा करुन भविष्यातील निर्णय घेईन.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com