मोठी बातमी : कॅप्टन काँग्रेस सोडणार पण भाजपमध्येही जाणार नाहीत

अमरिंदरसिंग यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. यामुळे कॅप्टन लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी चर्चा होती.
Amarinder Singh
Amarinder SinghSarkarnama
Published on
Updated on

नवी दिल्ली : पंजाबचे (Punjab) माजी मुख्यमंत्री (Chief Minister) अमरिंदरसिंग हे काँग्रेसला (Congress) धक्का देणार असल्याची चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी दिल्लीत भाजपचे (BJP) नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांची भेट घेतली होती. यामुळे कॅप्टन हे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी शक्यता व्यक्त आहे. यावर अखेर कॅप्टन यांनी मौन सोडून पुढील वाटचालीचे संकेत देत भाजपलाही धक्का दिला आहे.

कॅप्टन यांनी काल (ता.29) दिल्लीत अमित शहांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. दोघांच्यात सुमारे तासभर चर्चा झाली होती. नंतर कॅप्टन शहांच्या निवासस्थानातून बाहेर पडले होते. लवकरच कॅप्टन भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी शक्यता व्यक्त होत आहे. त्यांना केंद्रात मंत्रिपद दिले जाईल, अशीही चर्चा सुरू आहे. कृषी मंत्रिपदाची जबाबदारी त्यांच्याकडे दिली जाईल, असेही बोलले जात आहे.

कॅप्टन यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना पुढील वाटचालीचे संकेत दिले आहेत. त्यांनी काँग्रेस अथवा भाजपसोबत जाण्यास नकार दिला आहे. ते म्हणाले की, सध्या मी काँग्रेसमध्ये आहे. मला योग्य वागणूक देण्यात आली नाही. मी काँग्रेस सोडणार आहे पण भाजपमध्ये जाणार नाही. माझ्यावर विश्वासच नसेल अशा पक्षात मी का राहावे? आतापर्यंत पक्षाने माझा खूप अपमान केला आहे. यापुढे मी अपमान सहन करणार नाही. सोनिया गांधींनी सांगितले म्हणून मी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. आता पुढील निर्णय मी घेणार आहे.

Amarinder Singh
शहांची भेट घेतल्यानंतर तासाभरातच अमरिंदरसिंगांना काँग्रेसचा पहिला दणका

पक्षातील ज्येष्ठ नेत्यांचे राहुल गांधी यांनी ऐकायला हवे. ज्येष्ठ नेते हे चांगला सल्ला देणार आहेत. मला माझे राज्य सुरक्षित हवे आहे. सिद्धू हा बालिश असून, तो गंभीर प्रवृत्तीचा नाही. तो मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी यांच्यावर दबाव आणत आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Amarinder Singh
दुखणं पंजाबात अन् सिब्बलांनी सांगितला दिल्लीतला जालीम उपाय

मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर अमरिंदरसिंग यांनी मनातील खदखद व्यक्त करीत भविष्यात वेगळा निर्णय घेण्याचे संकेत दिले होते. अमरिंदरसिंग म्हणाले होते की, पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी चर्चा केल्यानंतर मी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. अशा प्रकारे आमदारांची बैठक बोलावून माझा अपमान करण्याची ही तिसरी वेळ आहे. ते त्यांच्या विश्वासातील व्यक्तीला आता मुख्यमंत्री नेमू शकतात. काँग्रेस अध्यक्षा जो निर्णय घेतील तो चांगला असेल. मी सध्या तरी काँग्रेससोबत आहे. मी समर्थकांशी चर्चा करुन भविष्यातील निर्णय घेईन.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com