CM Champai Soren  Sarkarnama
देश

Jharkhand Politics : मोठी बातमी ! झारखंडमधील चंपई सोरेन सरकार संकटात; 12 आमदार बंडाच्या तयारीत

CM Champai Soren : मुख्यमंत्री चंपई सोरेनही तातडीने काँग्रेस हायकमांडच्या भेटीला दिल्लीत दाखल

Ganesh Thombare

Jharkhand Political News : गेल्या काही दिवसांपासून झारखंडच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. चंपई सोरेन यांनी राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेत 'फ्लोर टेस्ट'ही जिंकली. यानंतर झारखंडमधील हायहोल्टेज राजकीय घडामोडींना पूर्णविराम मिळेल, असं वाटत असतानाच चंपई सोरेन सरकार अडचणीत येण्याची शक्यता आहे.

झारखंडमधील काँग्रेसचे 12 आमदार नाराज असून 12 आमदारांपैकी आठ आमदार रात्री उशिरा दिल्लीत दखल झाले आहेत. हे नाराज आमदार दिल्लीत काँग्रेस हायकमांडची भेट घेण्याची शक्यता आहे. तर दुसकीकडे झारखंडचे मुख्यमंत्री चंपई सोरेन हे देखील दिल्लीत दाखल झाले असून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेची भेट घेणार आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रिपद न मिळाल्यामुळे काँग्रेसचे 17 पैकी 12 आमदार बंडाच्या तयारीत आहेत. बंडाच्या तयारीत असलेल्या 12 आमदारांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनावर बहिष्कार घालण्याचा इशारा दिला आहे. काँग्रेसच्या जुन्या चेहऱ्यांनाच संधी दिल्यामुळे हे आमदार नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे.

मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भातील यादी शुक्रवारी राजभवनाला पाठवल्यानंतर या 12 आमदारांनी नाराजी व्यक्त केली. तसेच हे आमदार बंडाच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे चंपई सोरेन सरकार काही दिवसांतच संकटात आले आहे. या 12 आमदारांपैकी आठ आमदार दिल्लीत दाखल होत काँग्रेस हायकमांडची भेट घेणार आहेत. त्यामुळे या आमदारांची नाराजी दूर करण्यास काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना यश येते का ? ते पाहणे महत्वाचे असणार आहे.

आमदारांची नाराजी का ?

मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांच्या मंत्रिमंडळात काँग्रेसच्या जुन्या चेहऱ्यांनाच संधी देण्यात आल्याचा आरोप या आमदारांनी केला आहे. त्यांना मंत्रिपदावरून हटवून नव्या चेहऱ्यांना संधी द्यावी, अशी मागणी काँग्रेसच्या या नाराज आमदारांनी केली आहे. ज्यांना मंत्रिपदाची संधी देण्यात आली ते हेमंत सोरेन यांच्या सरकारमध्येही मंत्री होते. मात्र, यांच्यापैकी कोणाचीही कामगिरी चांगली नसल्याचा दावा, या आमदारांनी केला आहे. दरम्यान, आता या आमदारांची समजूत घालण्यास मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांना यश मिळणार का ? हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे.

Edited By-Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT