Rahul Gandhi : अचानक असे काय झाले ? भारत जोडो न्याय यात्रा स्थगित

Wayanad Elephant Oobstructs : वायनाडच्या हत्तींनी थांबवली गांधींची न्याय यात्रा
Rahul Gandhi
Rahul GandhiSarkarnama
Published on
Updated on

Rahul Gandhi : उत्तर प्रदेशातील वाराणसी येथून पुढे प्रयागराज येथे आलेली भारत जोडो न्याय यात्रा शनिवारी रात्री अचानक स्थगित करण्यात आली आहे. राहुल गांधी यांनी शनिवार (ता. 17) अचानक त्यांचा लोकसभा मतदारसंघ वायनाडकडे धाव घेतली आहे. भारत जोडो न्याय यात्रा सुरू असताना अचानक राहुल गांधी यांनी यात्रा अर्ध्यावर सोडून थेट वायनाड का गाठले? असा प्रश्न सर्वत्र विचारला जात आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात भारत जोडो न्याय यात्रा उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथून पुन्हा कधी सुरू होईल, असा प्रश्न विचारला जात आहे. एकीकडे दिल्लीत भाजपचे राष्ट्रीय अधिवेशन सुरू आहे आणि दुसरीकडे भारत जोडो यात्रा मध्येच सोडून काँग्रेस नेते राहुल गांधी अचानक वायनाडला का रवाना झाले, असा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चिला जात आहे.

मणिपूर ते मुंबई अशी साडेसहा हजार किलो मीटरची भारत जोडो न्याय यात्रा राहुल गांधी यांच्या नेतृत्वात सुरू आहे. काँग्रेसने लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने ही दुसरी यात्रा देशात काढली आहे. या यात्रेत राहुल गांधी 110 जिल्ह्यातून प्रवास करणार आहे. या प्रवासात ते स्थानिकांच्या भेटी घेत आहे. त्याच बरोबर छोट्याखानी सभांना संबोधित करत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Rahul Gandhi
Aaditya Thackeray : "राहुल गांधींना पंतप्रधान व्हायचं असेल तर भाजपत जावे, कारण...", आदित्य ठाकरेंचं विधान

विविध समविचारी राजकीय पक्षांच्या नेत्यांसोबत भेट आणि संयुक्त दौरा या भारत जोडो न्याय यात्रेतून राहुल गांधी करत आहे. पण, उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे पोहचल्यावर राहुल गांधी यांनी आजचा दौरा मध्येच स्थगित करत वायनाड या त्यांच्या मतदार संघाकडे धाव घेतली आहे. भारत जोडो न्याय यात्रेच्या 36 व्या दिवशी प्रयागराज येथे पदयात्रा आणि रॅलीला राहुल गांधी संबोधित करणार होते. ते शनिवार रात्रीतून अचानक वायनाडकडे रवाना झाले आहेत. त्यांचा वायनाड या लोकसभा मतदार संघातील अचानक दौरा अनेक प्रश्न उपस्थित करत आहे.

हत्ती आणि माणसाचा संघर्ष वायनाड येथे सुरू झाला आहे. शुक्रवारी सकाळी एका जंगली हत्तीच्या हल्ल्यामध्ये एक व्यक्ती गंभीर जखमी झाला होता. त्या व्यक्तीला कोझिकोड मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते, पण त्यातच त्याचा मृत्यू झालाय. मृत व्यक्ती वन विभागाचा इको-टुरिझम गाइड होता. वायनाड येथे जवळपास पाच ते सहा लोकांचा मृत्यु जंगली हत्तीच्या हल्ल्यात झाला. या विरोधात स्थानिक पक्षांनी खासदार राहुल गांधी यांच्या दुर्लक्षावर टीका केली आहे. हत्तीच्या हल्ल्यात व्यक्तीचा मृत्यु झाल्याने विरोधी पक्ष युडीएफ आणि भाजप (BJP) आक्रमक झाली आहे.

Rahul Gandhi
Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाडांनी धनंजय मुंडेंची लायकीच काढली; म्हणाले, 'ज्याच्या रक्तात गद्दारी...'

प्राण्यांच्या सामान्य माणसांवर होणाऱ्या हल्ल्यांच्या घटनावर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी वायनाड जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. स्थानिक लोकांचा रोष कमी करण्यासाठी राहुल गांधी यांना तत्काळ वायनाड येथे रवाना व्हावे लागले त्यामुळे त्यांची उत्तर प्रदेशातील भदोही येथील शनिवार रात्रीची बैठक आणि स्थानिकांचा संवाद होऊ शकला नाही. वायनाड (Wayanad) येथील हत्तींनी राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा थांबविली असून आता प्रयागराज येथुन पुन्हा काँग्रेसची (Congress) ी भारत जोडो न्याय यात्रा सुरू होईल, अशी आशा काँग्रेस नेत्यांनी व्यक्त केली आहे. वायनाड येथील जंगली हत्तींमुळे आणि लोकसभा निवडणूक (Lok Sabha) पाहता राहुल गांधी यांना अचानक वायनाड गाठावे लागले.

Edited By : Sachin Deshpande

Rahul Gandhi
Nashik Politics : लाठ्या काठ्यांच्या वादात मुनगंटीवार उतरणार का ?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com