Parliament bill VB G Ram G  Sarkarnama
देश

G Ram G : खुशखबर! आता 100 नाही तर 125 दिवस मिळणार हक्काचे काम; मोदींच्या नव्या योजनेचा तुम्हाला कसा होणार फायदा?

Modi government announces a 125 days job guarantee scheme : मोदी सरकारच्या नव्या योजनेत 125 दिवसांच्या कामाची हमी. तुमचे उत्पन्न किती वाढेल, पात्रता आणि फायदे जाणून घ्या सविस्तर.

Rashmi Mane

G Ram G 125 days work guarantee: आता ग्रामीण भागातील कुटुंबांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. केंद्र सरकार मनरेगाच्या जागी विकसित भारत – जी राम जी (VB-G RAM G) ही नवी योजना आणत आहे.

या नव्या योजनेमुळे प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला वर्षाला थेट 125 दिवसांच्या कामाची कायदेशीर हमी मिळणार आहे. म्हणजेच आधीच्या 100 दिवसांच्या तुलनेत आता 25 दिवसांचे जादा रोजगार मिळणार असून, त्यामुळे ग्रामीण कुटुंबांचे उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे.

सरकार आज संसदेत या संदर्भातील विधेयक सादर करणार आहे. हे विधेयक मंजूर झाल्यास 2005 साली सुरू झालेला महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा (मनरेगा) रद्द करून त्याच्या जागी नवी योजना लागू करण्याचा प्रस्तावाचे विधेयक काल खासदारांना वाटप करण्यात आले.

मनरेगाअंतर्गत ग्रामीण भागातील कुटुंबांना दरवर्षी 100 दिवसांचे अकुशल काम मिळत होते. 2008 पासून ही योजना देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये लागू झाली होती आणि लाखो कुटुंबांना तिचा फायदा झाला.

नव्या योजनेला ‘विकसित भारत 2047’ या राष्ट्रीय दृष्टीकोनाशी जोडण्यात आले आहे. या अंतर्गत Viksit Bharat Guarantee for Rozgar and Ajeevika Mission (Gramin) 2025 नावाचे ग्रामीण विकासाचे नवे फ्रेमवर्क तयार करण्यात येणार आहे.

या योजनेचा उद्देश केवळ रोजगार देणे एवढाच मर्यादित नसून, ग्रामीण भारत अधिक सक्षम, समृद्ध आणि आत्मनिर्भर बनवणे हा आहे. ग्रामीण कुटुंबातील जे प्रौढ सदस्य अकुशल काम करण्यास तयार असतील, त्यांना 125 दिवसांचे रोजगार हमखास मिळतील.

असा होणार तुमचा फायदा?

या योजनेमुळे उत्पन्नात किती वाढ होऊ शकते, हे कामाच्या दरावर अवलंबून असेल. उदाहरणार्थ, जर एका दिवसाची मजुरी सरासरी 300 रुपये धरली, तर 125 दिवसांत सुमारे 37,500 रुपयांचे उत्पन्न मिळू शकते. आधी 100 दिवसांत मिळणाऱ्या 30,000 रुपयांच्या तुलनेत हे उत्पन्न थेट 7,500 रुपयांनी वाढू शकते. अनेक ग्रामीण कुटुंबांसाठी ही वाढ अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT