

केंद्र सरकारने ग्रामीण विकासासाठी ‘G RAM G’ नावाची नवी संकल्पना/योजना मांडली असून ती आधुनिक तंत्रज्ञान व लोकसहभागावर आधारित आहे.
या योजनेत महात्मा गांधींच्या पारंपरिक दृष्टिकोनाऐवजी ‘जी राम जी’ या नव्या कार्यपद्धतीचा उल्लेख होत असून त्यावर राजकीय चर्चा रंगली आहे.
पायाभूत सुविधा, रोजगारनिर्मिती आणि गावांच्या सर्वांगीण विकासावर भर देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
G Ram G चा फुल फॉर्म काय?
केंद्र सरकार सध्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात एक महत्त्वाचा विधेयक लोकसभेत सादर करण्याच्या तयारीत आहे. या विधेयकामुळे गेल्या दोन दशकांपासून ग्रामीण भागातील रोजगाराचा आधार ठरलेली महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, म्हणजेच मनरेगा, बदलली जाण्याची शक्यता आहे. सरकारकडून आणल्या जाणाऱ्या नव्या योजनेचे नाव ‘विकसित भारत गारंटी फॉर रोजगार अँड आजीविका मिशन (ग्रामीण)’ (Viksit Bharat – Guarantee for Rozgar and Ajeevika Mission (Gramin) असे असून, याला सोप्या शब्दांत VB G RAM G किंवा ‘जी राम जी’ असे संबोधले जात आहे.
या विधेयकासाठी भाजपने आपल्या सर्व खासदारांना 15 ते 19 डिसेंबरदरम्यान लोकसभेच्या कामकाजात उपस्थित राहण्याचे व्हिप जारी केले आहे. त्यामुळे सरकार ही योजना लवकरच संसदेत मांडणार, हे जवळपास निश्चित मानले जात आहे.
केंद्र सरकार मनरेगाच्या जागी एक नवीन कायदा आणू इच्छिते. या नव्या कायद्याचा उद्देश ‘विकसित भारत 2047’ या व्हिजनशी जोडलेला असल्याचे सांगितले जात आहे. ग्रामीण भागातील रोजगार, उत्पन्न आणि उपजीविका यांना अधिक व्यापक स्वरूप देण्यासाठी हा बदल करण्यात येत असल्याचा दावा सरकारकडून केला जात आहे.
सध्याच्या मनरेगा योजनेत ग्रामीण कुटुंबांना वर्षाला 100 दिवसांच्या रोजगाराची हमी दिली जाते. मात्र, नव्या ‘जी राम जी’ योजनेत ही मर्यादा वाढवून 125 दिवस करण्याचा प्रस्ताव आहे. यामुळे ग्रामीण भागातील मजुरांना अधिक काम आणि थोडे जास्त उत्पन्न मिळेल, असा सरकारचा दावा आहे. मनरेगाने गेल्या 20 वर्षांत अनेक गरीब कुटुंबांना आधार दिला असून, रोजगाराच्या दृष्टीने ती एक गेमचेंजर योजना ठरली आहे.
या विधेयकाची प्रत आधीच लोकसभा खासदारांना वितरित करण्यात आली आहे. जर हे विधेयक संसदेत मंजूर झाले आणि दोन्ही सभागृहांची संमती मिळाली, तर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अधिनियम, 2005 रद्द होईल. त्याऐवजी ‘विकसित भारत गारंटी फॉर रोजगार अँड आजीविका मिशन (ग्रामीण)’ ही नवीन योजना लागू होईल. यामुळे ग्रामीण रोजगाराची व्याख्या बदलण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे मानले जात आहे.
हे विधेयक जाहीर होताच राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी सरकारवर प्रश्न उपस्थित केले आहेत. महात्मा गांधींचे नाव योजनेतून का काढले जात आहे, असा सवाल त्यांनी केला. गांधीजी हे देशाच्या आणि जगाच्या इतिहासातील महान नेते असल्याचे सांगत, सरकारचा हा निर्णय समजण्यापलीकडचा असल्याची टीका त्यांनी केली आहे. त्यामुळे ‘जी राम जी’ योजना केवळ रोजगारापुरती मर्यादित न राहता, राजकीय वादाचे केंद्रबिंदू ठरण्याची शक्यता आहे.
प्रश्न: G RAM G योजना म्हणजे काय?
उत्तर: ग्रामीण भारताचा वेगवान व तंत्रज्ञानाधारित विकास साधण्यासाठी केंद्र सरकारची नवी योजना आहे.
प्रश्न: ‘जी राम जी’ या संकल्पनेचा अर्थ काय?
उत्तर: नव्या प्रशासनिक व विकासात्मक दृष्टिकोनाचे प्रतीक म्हणून हा शब्दप्रयोग वापरला जात आहे.
प्रश्न: या योजनेचा लाभ कोणाला होणार?
उत्तर: ग्रामीण भागातील शेतकरी, युवक, महिला व स्थानिक स्वराज्य संस्थांना थेट लाभ होणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.