In a major political development in Delhi, 20 rebel Trinamool Congress MPs met Lok Sabha Speaker Om Birla and announced their merger with the Nationalist Citizens Party.  Sarkarnama
देश

TMC Rebel MPs : ममता बॅनर्जींना सर्वात मोठा धक्का; 20 बंडखोर खासदारांचा गट NCPI मध्ये विलीन, बिर्लांच्या भेटीनंतर घोषणा

Trinamool Congress Crisis : एनसीपीआय या पक्षाची फारशी माहिती उपलब्ध नाही. २०२३ मध्ये या पक्षाची स्थापना झाली होती.

Rajanand More

TMC Split : पश्चिम बंगालमधील राजकारणाला रविवारी धक्कादायक वळण मिळाले. मागील काही दिवसांपासून या खासदारांकडून तृणमूल काँग्रेसच्याच नावाने स्वतंत्र गट करून एनडीए सरकारला पाठिंबा दिला जाणार असल्याची चर्चा होती. मात्र, आज या २० बंडखोर खासदारांनी स्वतंत्र गट करत तो नॅशनलिस्ट सिटीझन्स पार्टी ऑफ इंडिया (NCPI) मध्ये विलीन केल्याची घोषणा केली.

स्वतंत्र गट केल्यास खासदारांवर अपात्रतेची कारवाई होऊ शकते, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. यापार्श्वभूमीवर बंडखोर खासदारांनी सुरक्षित मार्गाचा अवलंब करत फार चर्चेत नसलेल्या एनसीपीआय या त्रिपुरातील छोट्या राजकीय पक्षामध्ये गट विलीन करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

बंडखोर खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना तसे पत्र दिले आहे. तसेच या गटाने 'एनडीए'लाही पाठिंबा जाहीर केला आहे. या खासदारांची आसनव्यवस्था बदलण्याची मागणीही बिर्ला यांच्याकडे करण्यात आली आहे. याबाबत आता बिर्ला यांच्याकडून अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. बिर्ला यांनी २० खासदारांच्या विलीनीकरणाला मान्यता दिल्यास तृणमूलसाठी हा मोठा धक्का असेल.

याबाबत माहिती देताना बंडखोर खासदार सुदीप बंदोपाध्याय यांनी सांगितले की, 'आम्ही नॅशनलिस्ट सिटीझन्स पार्टीमध्ये विलीन झालो आहोत. हा मान्यताप्राप्त प्रादेशिक पक्ष आहे. आता खरी टीएमसी कोण आहे, याचा निर्णय कोर्टात होईल.' बंदोपाध्याय यांनी जाहीर केलेल्या भूमिकेमुळे आता हे खासदार तृणमूलवरही दावा सांगणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, बंडखोर खासदारांनी दुपारी केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांची दिल्लीत भेट घेतली. बराच वेळ ही बैठक सुरू होती. या बैठकीनंतर बंडखोर खासदारांनी बिर्ला यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचीही भेट घेत त्यांना विलीनीकरणाचे पत्र दिले. या बैठकीतच एनसीपीआयमध्ये विलीनीकरणावर शिक्कामोर्तब झाल्याचे समजते.

कायदेशीर अडचणी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, एनसीपीआय या पक्षाची फारशी माहिती उपलब्ध नाही. २०२३ मध्ये या पक्षाची स्थापना झाली होती. त्रिपुरामध्ये दोन जागांवर निवडणूक लढल्याचे दिसते. त्यानंतरही पक्षाने निवडणूक लढण्याची माहिती उपलब्ध नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT