IAS.jpg Sarkarnama
देश

IAS transfer : प्रशासनात अचानक 'सर्जिकल स्ट्राइक'! एकाच रात्रीत 42 IAS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या

major IAS reshuffle latest news : प्रशासनात मोठा फेरबदल करण्यात आला असून एकाच रात्रीत 42 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. कोणत्या अधिकाऱ्यांना कुठे नियुक्ती मिळाली, जाणून घ्या.

Rashmi Mane

जम्मू-काश्मीरच्या प्रशासनात मोठा फेरबदल करण्यात आला आहे. नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांच्या मंजुरीनंतर 42 IAS अधिकाऱ्यांसह एकूण 49 अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि नियुक्त्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत. या प्रशासकीय फेरबदलात जम्मूचे विभागीय आयुक्त आणि 8 जिल्ह्यांच्या उपायुक्तांसह अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये बदल करण्यात आला आहे. सामान्य प्रशासन विभागाने (GAD) यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत.

विकास कुंडल यांच्याकडे जम्मूची जबाबदारी

2013 बॅचचे IAS अधिकारी विकास कुंडल यांची जम्मूचे विभागीय आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी रमेश कुमार यांच्याकडील जबाबदारी स्वीकारली आहे. कुंडल यांची जम्मू-काश्मीर सेवा निवड मंडळाच्या अध्यक्षपदावरून बदली करण्यात आली असून, जम्मू मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलपमेंट अथॉरिटीच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा अतिरिक्त कार्यभारही त्यांच्याकडे देण्यात आला आहे.

रमेश कुमार यांच्याकडे नव्या जबाबदाऱ्या

रमेश कुमार यांची ग्रामीण विकास आणि पंचायत राज विभागाच्या सचिवपदी नियुक्ती झाली आहे. याशिवाय नवी दिल्लीतील जम्मू-काश्मीर सरकारचे निवासी आयुक्त म्हणूनही ते काम पाहणार आहेत. सांस्कृतिक विभागाची अतिरिक्त जबाबदारीदेखील त्यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.

8 जिल्ह्यांच्या उपायुक्तांच्या बदल्या

या फेरबदलात जिल्हा प्रशासनातही मोठे बदल करण्यात आले आहेत. मिंगा शेरपा यांची जम्मूच्या उपायुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. देवांश यादव यांच्याकडे राजौरी, अभिषेक शर्मा यांच्याकडे कुपवाडा, जतिन किशोर यांच्याकडे बडगाम, श्रेया सिंघल यांच्याकडे गांदरबल, रुपेश कुमार यांच्याकडे सांबा, अनंत द्विवेदी यांच्याकडे उधमपूर आणि कुलदीप कृष्ण सिधा यांच्याकडे पुलवामा जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली आहे. चरणदीप सिंग यांची शोपियानच्या उपायुक्तपदी नियुक्ती झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT