Shirur Gram Panchayat Election : शिरूरच्या 79 ग्रामपंचायतींचा बिगुल वाजण्याआधीच इच्छुक मैदानात; मंडळांना मदत, सहली अन् कार्यक्रमांची रेलचेल!

Shirur Gram Panchayat election political activity : शिरूर तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे पडघम वाजण्याआधीच इच्छुक उमेदवार सक्रिय झाले आहेत. मंडळांना मदत, सहली आणि विविध कार्यक्रमांतून जनसंपर्क वाढवण्यावर भर.
Shirur Gram Panchayat election
Shirur Gram Panchayat electionSarkarnama
Published on: 
Updated on: 

Pune News : शिरूर तालुक्यातील ७९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नसली, तरी गावागावातील राजकीय हालचालींना मात्र वेग आला आहे. निवडणूक कधी जाहीर होणार, याकडे इच्छुकांसह नागरिकांचे लक्ष लागले असतानाच संभाव्य उमेदवारांनी आतापासूनच आपापली मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

शिक्रापूर जिल्हा परिषद गटातील शिक्रापूर, कासारी, सणसवाडी, कोरेगाव भीमा, वाडागाव यांसह अनेक ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. काही ग्रामपंचायतींचा कार्यकाळ संपल्याने तेथे प्रशासक नियुक्त करण्यात आले आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास इच्छुक असलेल्या अनेकांनी आतापासूनच जनसंपर्कावर भर दिला आहे.

Shirur Gram Panchayat election
MPSC Students Protest : MPSC आंदोलनाचा मुद्दा हायकोर्टात; न्यायमूर्तींकडून विद्यार्थ्यांना मोठा दिलासा...

गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, आरोग्य व रक्तदान शिबिरे, सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू आहे. मंडळांना आर्थिक मदत, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, गरजू कुटुंबांना मदत, धार्मिक कार्यक्रमांना सहकार्य, स्नेहमेळावे आणि सहलींचे आयोजन अशा माध्यमातून इच्छुकांकडून आपापला ‘जनसंपर्काचा’ पॅटर्न तयार केला जात आहे.

नागरिकांच्या छोट्या-मोठ्या अडचणी सोडविण्यासाठी पुढाकार घेण्यापासून ते सार्वजनिक कार्यक्रमांना आवर्जून उपस्थित राहण्यापर्यंत अनेक इच्छुक सक्रिय झाले आहेत. त्यामुळे निवडणुकीची घोषणा होण्याआधीच गावागावातील राजकीय वातावरण तापू लागले आहे.

देणग्या, सहली अन् कार्यक्रम; राजकीय गणिताची चाचपणी?

गावातील मंडळे आणि सामाजिक संस्थांना मिळणारी आर्थिक मदत, विद्यार्थ्यांना साहित्य वाटप, गरजू कुटुंबांना मदत तसेच नागरिकांसाठी आयोजित सहली आणि स्नेहमेळावे यांचीही सध्या गावोगावी चर्चा आहे. या उपक्रमांकडे नागरिक बारकाईने पाहत असून, सामाजिक कार्य की आगामी निवडणुकीची तयारी, असा सवालही उपस्थित केला जात आहे.

मात्र, केवळ निवडणुकीच्या तोंडावर कार्यक्रम घेणे किंवा आर्थिक मदत करणे पुरेसे ठरणार नाही. वर्षभर नागरिकांच्या प्रश्नांसाठी कोण पुढे येतो, मूलभूत सुविधांसाठी कोण पाठपुरावा करतो आणि निवडून आल्यानंतर विकासकामांना कोण प्राधान्य देतो, यावर मतदारांचा कौल अवलंबून राहण्याची शक्यता आहे.

Shirur Gram Panchayat election
Top 10 News : मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांच्या ओएसडीवर गुन्हा दाखल; रिझर्व्ह बँकेकडून झटका; कर्जाच्या हप्त्यांसाठी मोजावे लागणार अधिकचे पैसे; वाचा महत्त्वाच्या घडामोडी!

निवडणुकीपूर्वीच शक्तीप्रदर्शनाला सुरुवात

कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी, गावभेटी, सार्वजनिक कार्यक्रमांना उपस्थिती, स्थानिक प्रश्नांमध्ये हस्तक्षेप आणि नागरिकांशी थेट संवाद यामुळे संभाव्य उमेदवारांनी आपली ताकद आजमावण्यास सुरुवात केली आहे. काही गावांमध्ये संभाव्य उमेदवारांच्या नावांवरून समर्थकांमध्ये चर्चाही रंगू लागल्या आहेत. कोण निवडणुकीच्या मैदानात उतरणार? कोणाला पक्षाची साथ मिळणार? कोण अपक्ष म्हणून रिंगणात उतरणार? आणि स्थानिक राजकीय समीकरणे कोणाच्या बाजूने झुकणार? याची उत्सुकता आता शिरूर तालुक्यात वाढली आहे.

निवडणुकीची अधिकृत घोषणा आणि आचारसंहिता लागू झाल्यानंतर प्रचाराच्या स्वरूपावर तसेच खर्च व इतर निवडणूक नियमांवर अधिकृत निर्बंध लागू होतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या उपक्रमांकडेही राजकीय आणि प्रशासकीय यंत्रणेचे लक्ष राहणार आहे. निवडणुकीचा बिगुल वाजण्यापूर्वीच इच्छुकांनी आपापली ‘फिल्डिंग’ लावण्यास सुरुवात केल्याने शिरूरच्या ७९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत यंदा कोणाचे पारडे जड ठरणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com