G-20 Summit 2023 : Sarkarnama
देश

G-20 Summit 2023 : ४५ हजार कमांडो तैनात ; G-20 च्या पाहुण्यांसाठी राजधानी दिल्लीला छावणीचे स्वरूप

अनुराधा धावडे

New Delhi : जी 20च्या शिखर परिषदेसाठी जगभरातील राष्ट्रप्रमुख राजधानी दिल्लीत दाखल होणार आहेत. या पाहुण्यांच्या स्वागतासाठी संपूर्ण राजधानी दिल्ली सज्ज झाली आहे. त्याचबरोबर दिल्लीला छावणीचे स्वरूपही आले आहे. दिल्लीत येणाऱ्या पाहुण्यांसाठी 50 हजार सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

जी 20 परिषद प्रगती मैदानावरील भारत मंडपम इथं होणार आहे. या मैदानाखाली असलेल्या टनेलच्या खाली श्वान पथकासह कमांडोजला तैनात करण्यात आलं आहे. त्याचबरोबर परदेशी पाहुणे ज्या 5 स्टार हॉटेलमध्ये थांबणार आहे. त्या हॉटेलसह आसपासचा परिसरही नो फ्लाई झोन घोषित केला आहे.

जागतिक सुरक्षा यंत्रणांसह गुप्तचर यंत्रणांचंही लक्ष...

दिल्ली पोलिस, पॅरामिलिट्री फोर्स, एनएसजी, सीआरपीएफ, आईबी आणि रॉ पासून ब्रिटेन ची एमआई6, रशिया ची केजीबी, अमेरिकेची सीआईए आणि इजरायलच्या मोसादसारख्या जागतिक गुप्तचर यंत्रणाचीबी भारतातील जी 20 परिषदेवर नजर असेल. (Delhi G-20 summit)

अशी असेल सुरक्षा व्यवस्था

दिल्ली पोलिसांच्या 50 हजार जवानांसह, पॅरामिलिट्री फोर्स, एनएसजी आणि सीआरपीएफ कमांडो तैनात...

दिल्लीतील उंच इमारतीवर एअरक्राफ्ट गन मशिन लावण्यात आल्या आहेत

प्रत्येक घटनेवर नजर ठेवण्यासाठी 40,000 हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत.

महत्त्वाच्या ठिकाणी फेस रेकगनिशन कॅमेरे तैनात

संभावित धोके ओळखून प्रत्येक हॉटेलमधून पाहुण्यांना काढण्यासाठी वायुसेनेचे चॉपर तैनात

सायबर हल्ल्याच्या दृष्टीकोनातून यंत्रणा तयार

हवेतून होणाऱ्या धोक्याचा विचार करता दिल्लीत मिसाईल तैनात

कोणता नेता कुठं थांबणार आणि दिल्लीत कधी पोहोचणार?

अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडेन- आईटीसी मौर्या आज सायंकाळी 6:55 वाजता

इग्लंडचे पंतप्रधान ऋषि सुनक- हॉटेल शांगरी आज दुपारी 1.40 वाजता

कॅनाडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो- द ललित हॉटेल आज सायंकाळी 7 वाजता

फ्रांसचे राष्ट्रपती इमैनुएल मैक्रो- क्लैरिजेस हॉटेल आज दुपारी 12.35 वाजता

जापानचे पंतप्रधान फिमियो किशिदो- द ललित हॉटेल, आज दुपारी 2.15 वाजता

४५ हजार कमांडो तैनात

जी-२०च्या बैठकीसाठी 45,000 कमांडो तैनात करण्यात आले आहेत. या कमांडोंनी हेलिकॉप्टरवर हल्ला करण्याचे प्रशिक्षण घेतले आहे. दिल्ली पोलीस, NSG आणि केंद्रीय दलाचे जवान दिल्लीच्या प्रत्येक कानाकोपऱ्यावर बारीक नजर ठेवणार आहेत. संपूर्ण शहरात विशेषत: नवी दिल्ली जिल्ह्यात सीसीटीव्ही फुटेजसाठी दोन नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT