Pune Politics : माजी आमदार सोनवणेंना धक्का : खंदे समर्थक वाळुंज यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

Atul Benke News : नारायणगाव येथे सचिन वाळुंज यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह पक्षात प्रवेश केला.
Atul Benke News
Atul Benke NewsSarkarnama

Narayangaon News : माजी आमदार शरद सोनवणे यांचे खंदे समर्थक, वडगाव आनंद सोसायटीचे अध्यक्ष सचिन वाळुंज यांनी आमदार अतुल बेनके (Atul Benke) यांच्या उपस्थितीत समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. मंगळवारी (ता. 5) सायंकाळी नारायणगाव येथे झालेल्या कार्यक्रमात सचिन वाळुंज यांनी आपल्या तीस ते पस्तीस कार्यकर्त्यांसह पक्षात प्रवेश केला.

यावेळी जुन्नर (Junnar) तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष पांडुरंग पवार, जिल्हा दूध संघाचे उपाध्यक्ष भाऊ देवाडे, संचालक बाळासाहेब खिलारी, माजी जिल्हा परिषद सदस्य मोहित ढमाले, फिरोज पठाण, पापा खोत, विकास दरेकर, बाजार समितीचे उपसभापती प्रकाश ताजने, संचालक प्रीतम काळे, अतुल भांबिरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Atul Benke News
Bachchu Kadu News : बच्चू कडूंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल ; बदनाम झालो पण...; शिंदे-फडणवीसांनी दिलेला शब्द पाळला..

राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर वाळुंज म्हणाले, वडगाव आनंद, आळे, आळेफाटा, पादिरवाडी परिसरात नागरीकरण वाढले आहेत. मागील पंधरा वर्षे मित्र म्हणून मी एका व्यक्तीच्या प्रेमात होतो. त्यांचे निष्ठेने काम केले. मात्र, या भागातील सांडपाणी, पाणी, रस्ते आदी महत्त्वाचे प्रश्न सुटले नाहीत. माजी आमदार वल्लभ बेनके यांनी पिंपळगाव जोगा कालव्याचा प्रश्न मार्गी लावला आहे. यामुळे या भागातील शेतकऱ्यांची प्रगती झाली. आमदार बेनके यांच्या प्रयत्नामुळे चिल्हेवाडी पाईपलाईनच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 100 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला.

विकासाचा दृष्टिकोन ठेवून बेनके काम करत आहेत. परिसरातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय घेतला. यापुढील काळात राष्ट्रवादी पक्षाचे काम निष्ठेने करणार आहे. बेनके म्हणाले, कार्यकर्ता नेत्यावर विश्वास टाकतो. हा विश्वास सत्कारणी लावण्याचे काम नेत्याचे असते. फक्त भाषणे ठोकून उपयोग नाही. आणे माळशेज पट्ट्यातील जनतेने माजी आमदार वल्लभ बेनके यांच्यावर विशेष प्रेम केले आहे. या भागातील जनतेच्या अशा, आकांक्षा पूर्ण करण्यासाठी मी कटिबद्ध आहे.

Atul Benke News
MP Imtiaz Jaleel On Farmers: महिनाभरात ९९ शेतकऱ्यांनी जीवन संपवले, दुष्काळाकडे वाटचाल, तरीही सरकार बेफिकीर..

आळे येथे रेल्वे स्टेशन होणार आहे. वडगाव आनंद येथून बाह्यवळण रस्ता जात आहे. या परिसरात वाढलेल्या नागरिकांमुळे नागरी सुविधा निर्माण करणे आवश्यक आहे. सचिन वाळुंज यांनी सुचवलेली सर्व कामे मार्गी लावली जातील, असे आश्वासन त्यांनी दिले. राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षामध्ये त्यांना मानाचे स्थान दिले जाईल. प्रास्ताविक पांडुरंग पवार यांनी तर सूत्रसंचालन भाऊ देवाडे यांनी केले.

वाळुंज यांच्या प्रवेशाबाबत माजी आमदार शरद सोनवणे म्हणाले, सचिन वाळुंज यांना राजकीय ताकद देऊन घडवण्याचे काम मी केले आहे. ते आता सक्षम झाले असल्याने त्यांनी निर्णय घेतला आहे. त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा.

Edited by : Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com