8th Pay Commission Pension Rules Sarkarnama
देश

8th Pay Commission : पगारवाढ अन् एरिअर्सची वाट पाहणाऱ्यांसाठी मोठी अपडेट! निर्णय पुन्हा लांबणीवर, नेमके कारण काय?

8th Pay Commission Latest Update : आठव्या वेतन आयोगाअंतर्गत केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीचा आणि एरिअर्सचा निर्णय पुन्हा लांबणीवर पडला आहे. विलंबाचे नेमके कारण काय? जाणून घ्या.

Rashmi Mane

केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी 8th Pay Commission अर्थात 8व्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. वाढती महागाई, दैनंदिन खर्च आणि आर्थिक गरजा लक्षात घेता लाखो कर्मचारी नवीन वेतनश्रेणी, पगारवाढ, पेन्शन आणि महागाई भत्त्यातील बदलांची प्रतीक्षा करत आहेत. मात्र, आठव्या वेतन आयोगाचा अहवाल सादर झाला म्हणजे लगेचच कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात वाढीव पगार जमा होईल, असे नाही. त्यासाठी केंद्र सरकारला काही महत्त्वाच्या प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण कराव्या लागणार आहेत.

8व्या वेतन आयोगाचा अहवाल कधी येणार?

8व्या केंद्रीय वेतन आयोगाची स्थापना 3 नोव्हेंबर 2025 रोजी करण्यात आली. आयोगाच्या अध्यक्षपदी निवृत्त न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आयोगाला आपला अहवाल सादर करण्यासाठी 18 महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. त्यामुळे मे 2027 पर्यंत अहवाल सादर होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्यानंतरच वेतनवाढीच्या अंमलबजावणीच्या प्रक्रियेला पुढे गती मिळेल.

अहवालानंतर पूर्ण होतील या 5 महत्त्वाच्या प्रक्रिया

सरकारकडून अहवालाची तपासणी : आयोगाने अहवाल सादर केल्यानंतर केंद्र सरकार त्यातील सर्व शिफारशींचा अभ्यास करेल. नवीन वेतनश्रेणी, पेन्शन, भत्ते आणि सरकारी तिजोरीवर पडणारा आर्थिक भार यांचा विचार केला जाईल.

शिफारशी स्वीकारण्याचा निर्णय : आयोगाने केलेल्या प्रत्येक शिफारशीची अंमलबजावणी करणे सरकारवर बंधनकारक नसते. त्यामुळे काही शिफारशी स्वीकारल्या जाऊ शकतात, तर काहींमध्ये बदल किंवा नकार दिला जाऊ शकतो.

स्वतंत्र समित्यांकडून तपासणी: पेन्शन, विविध भत्ते आणि सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुविधांबाबत काही मुद्द्यांची स्वतंत्रपणे तपासणी होऊ शकते. यासाठी तज्ज्ञ किंवा विशेष समित्यांची मदत घेतली जाऊ शकते.

अधिकृत अधिसूचना जारी: सर्व निर्णय अंतिम झाल्यानंतर केंद्र सरकार नवीन वेतनरचनेबाबत अधिकृत अधिसूचना जारी करेल. यामध्ये सुधारित वेतनमान, भत्ते, पेन्शन आणि लागू होण्याची तारीख स्पष्ट केली जाईल.

पगाराची गणना आणि एरिअर्सचे वितरण : अधिसूचनेनंतर सरकारी विभाग कर्मचाऱ्यांच्या सुधारित मूळ वेतनाची आणि पेन्शनची गणना करतील. नवीन वेतनरचना पूर्वलक्षी प्रभावाने लागू झाल्यास संबंधित कालावधीतील फरकाची रक्कम म्हणजेच एरिअर्स मिळू शकतात.

त्यामुळे 8व्या वेतन आयोगाचा अहवाल आल्यानंतरही प्रत्यक्ष पगारवाढीसाठी काही काळ प्रतीक्षा करावी लागू शकते. वाढीव पगार कधी मिळणार आणि एरिअर्सची रक्कम किती असणार, याबाबतचा अंतिम निर्णय केंद्र सरकारच्या अधिकृत घोषणेनंतरच स्पष्ट होईल. सध्या कर्मचारी आणि पेन्शनधारकांचे लक्ष सरकारच्या पुढील निर्णयाकडे लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT