Omar Abdullah : ...आणि अवघ्या 2 दिवसांतच विवाह बेकायदेशीर? ओमर अब्दुल्ला-निधी राझदान यांच्या लग्नावर मौलवीचा खळबळजनक फतवा जारी!

Omar Abdullah Nidhi Razdan marriage controversy : ओमर अब्दुल्ला आणि निधी राझदान यांच्या विवाहावर मौलाना शहाबुद्दीन रझवी यांनी फतवा जारी केला आहे. इस्लामिक नियमांचा हवाला देत त्यांनी विवाहावर आक्षेप का घेतला? जाणून घ्या.
Omar Abdullah Nidhi Razdan marriage fatwa
Omar Abdullah Nidhi Razdan marriage fatwaSarkarnama
Published on: 
Updated on: 

जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि पत्रकार निधी राझदान यांच्या विवाहाची घोषणा झाल्यानंतर अवघ्या 2 दिवसांतच या लग्नावरून नवा वाद निर्माण झाला आहे. ऑल इंडिया मुस्लिम जमातचे राष्ट्रीय अध्यक्ष मौलाना मुफ्ती शहाबुद्दीन रझवी बरेलवी यांनी या विवाहाबाबत फतवा जारी करत तो इस्लामच्या दृष्टिकोनातून नाजायज असल्याचे म्हटले आहे. दोघांचे धर्म वेगवेगळे असल्याचा मुद्दा उपस्थित करत मौलानांनी आपली भूमिका मांडली आहे.

मौलाना यांच्या म्हणण्यानुसार, इस्लाममध्ये विवाहासाठी काही धार्मिक नियम आणि अटी निश्चित करण्यात आल्या आहेत. त्यापैकी महत्त्वाची अट म्हणजे विवाह करणारे दोन्ही व्यक्ती मुस्लिम असणे आवश्यक आहे. यापैकी एक जरी व्यक्ती गैरमुस्लिम असेल, तर इस्लामिक मान्यतेनुसार असा विवाह वैध मानला जात नसल्याचे त्यांनी सांगितले.

Omar Abdullah Nidhi Razdan marriage fatwa
Sting Operation news : केंद्रीय मंत्र्यांच्या घरात शिजला स्टिंग ऑपरेशनचा प्लॅन? पोलिसांनी उडवून दिली खळबळ

ओमर अब्दुल्ला मुस्लिम आहेत, तर निधी राझदान या गैरमुस्लिम आहेत. त्यामुळे दोघांचा विवाह इस्लामच्या नियमांनुसार योग्य नसल्याचा दावा मौलानांनी केला आहे. याबाबत बोलताना त्यांनी म्हटले की, ओमर अब्दुल्ला यांनी विवाहापूर्वी निधी राझदान यांना इस्लाम स्वीकारण्यास सांगायला हवे होते. त्यानंतर विवाह केला असता, तर तो इस्लामिक मान्यतेनुसार योग्य ठरला असता. मात्र, तसे झाले नसल्याने हा विवाह बेकायदेशीर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, ओमर अब्दुल्ला यांनी 31 ऑक्टोबर रोजी सोशल मीडियावर निधी राझदान यांच्यासोबतच्या विवाहाची माहिती दिली होती. त्यांनी दोघांचे एकत्रित फोटो शेअर करत "A new journey began yesterday..." असे लिहिले होते.

Omar Abdullah Nidhi Razdan marriage fatwa
Punjab AAP Crisis: पंजाबमध्ये AAP ला दोन दिवसांत तीन धक्के! तीन आमदारांनी सोडली साथ, भाजपमध्ये प्रवेश

निधी राझदान यांनीही सोशल मीडियावर या नव्या आयुष्याची माहिती दिली. मिळालेल्या माहितीनुसार, या दोघांचा विवाह 30 ऑक्टोबर रोजी Special Marriage Act अंतर्गत पार पडला. दोन्ही कुटुंबांतील सदस्य या विवाह सोहळ्याला उपस्थित होते.