Rajasthan Politics : जयपूर : राजस्थानमध्ये (Rajasthan) राजकीय घडामोडी वेगाने बदलत आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) गटाच्या 90 हून अधिक आमदारांनी आपल्या पदांचा राजीनामा देण्याची धमकी दिली आहे. आमदार आपले राजीनामे विधानसभा अध्यक्षांकडे देऊ शकतात, अशी चर्चा आहे.
विधिमंडळ पक्षाच्या बैठकीपूर्वी गेहलोत गटाच्या आमदारांची शांती धारीवाल यांच्या घरी बैठक झाली. या बैठकीला जवळपास 56 आमदार उपस्थित होते. या बैठकीनंतर अशोक गेहलोत गटातील आमदारांनी आपल्याच गटातील कुणाला तरी मुख्यमंत्री करावे, यावर चर्चा केली. यासंदर्भात ठरावही मंजूर करण्यात आल्याची माहीत आहे.
अशोक गेहलोत गटाचे आमदार खाचरियावास यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, आम्ही सर्व आमदार सभापतींची भेट घेतल्यानंतर आपल्या पदाचा राजीनामा देऊ. पक्ष आमचे ऐकतो, आपोआप निर्णय घेतले जातात. गरज पडल्यास दिल्लीलाही जाऊ. हायकमांड आमचे प्रमुख आहेत. काँग्रेस (Congress) अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी आणि अशोक गेहलोत यांची भेट घेणार असल्याचेही सांगितले.
सध्या आमचे जवळपास १२५ आमदार आहेत, आमच्यासोबत अपक्ष आमदारही आहेत. विधीमंडळ पक्षाच्या बैठकीला न जाण्याचा निर्णय आमदारांनी आधीच घेतला होता. त्यांना न विचारता निर्णय घेतला जात असल्याची आमदारांची भावना आहे, असेही त्यांनी सांगितले होते.
शांती धारीवाल हे अशोक गेहलोत यांचे निकटवर्तीय असल्याचे सांगितले जाते. पक्षाच्या विधिमंडळ बैठकीपूर्वी होणारी ही बैठक विशेष मानली जात होती. मात्र, धारीवाल यांच्या घरी होणाऱ्या बैठकीचा अजेंडा काय होता, हे समजले नाही. मात्र, अशोक गेहलोत यांच्या निष्ठावान नेत्याचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी पुढे करण्यासाठी ही बैठक होत असल्याची चर्चा होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.