मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड करत शिवसेनेचे (Shivsena) ४० आमदार आणि १२ खासदारांना आपल्या गटात नेले आहे. त्यातच खरी शिवसेना कोणाची याची लढाई आता सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुरु आहे. शिंदे गट आणि शिवसेनेमध्ये आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण रंगले आहे.
दरम्यान, राज्यातील सत्ता संघर्षानंतर एकनाथ शिंदे यांनी एका वृत्तपत्रला मुलाखत दिली. त्यामध्ये त्यांना भविष्यात शिंदे गट आणि ठाकरे गट एकत्र येण्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर शिंदे म्हणाले, भविष्याचे काय सांगता येत नाही. सध्या चालले आहे, ते तर आपण बघता आहातच, असे उत्तर देत अधिकच बोलणे टाळले.
शिवसेनेचे पक्षप्रमुख कोण असतील, असा प्रश्नही शिंदे यांना विचारण्यात आला होता. त्यावर शिंदे म्हणाले, पक्ष प्रमुखपद जाऊ द्या. शिवसेना वाढली पाहिजे, हेच आमचे ध्येय, असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. बाळासाहेबांचे विचार आमच्यापासून कोणी हिरावून घेऊ शकतो का, असा सवाल त्यांनी केला. बाळासाहेबांनी कायम काँग्रेस व राष्ट्रवादीला विरोध केला होता. त्या विचारांपासून आम्ही फारकत घेतली, असेही ते म्हणाले.
दाऊदचे हस्तक असलेल्या मंत्र्याच्या विरोधात आम्ही कारवाई करू शकलो नाही. बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्याचे काम आम्ही करत आहोत, असे शिंदे यांनी सांगितले. या मुलाखतीत शिंदेंनी पक्षप्रमुख पद जाऊ द्या असे उत्तर दिले. तरी शिवसेनेविरोधात केलेल्या बंडानंतर शिंदेंनी मुंबईतल्या हॉटेल ट्रायडंटमध्ये आमदारांची एक बैठक घेतली होती. याच बैठकीत शिवसेनेचे मुख्यनेता असे पद शिंदेंना देण्यात आले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.