Ramesh Tawadkar and Govind Gawde Sarkarnama
देश

Goa BJP : गोव्यात भाजपच्या पक्षशिस्तीला तडे; सभापती तवडकर- मंत्री गावडे यांच्यात संघर्ष शिगेला...

BJP Politics in Goa : लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वीच गोव्यातील भाजप सरकारमधील दोन दिग्गज नेत्यांमध्ये संघर्ष उफाळला आहे. सभापती रमेश तवडकर आणि कला संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांच्या हा संघर्ष पेटला आहे.

Pradeep Pendhare

Goa BJP News : लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वीच गोव्यातील भाजप सरकारमधील दोन दिग्गज नेत्यांमध्ये संघर्ष उफाळला आहे. गोव्यातील भाजप सरकारमधील सभापती रमेश तवडकर आणि कला-संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांच्या हा संघर्ष पेटला आहे. या संघर्षाचे पडसाद पक्षावर पडू लागले असून यामुळे पक्षशिस्तीला तडे जाऊ लागले आहेत.

लोकसभा निवडणुकीचा (Lok Sabha Elections) निकाल लागण्‍यास आता सात दिवस बाकी आहेत. यातच गोव्यातील भाजपमधील दिग्गज नेते तवडकर आणि गावडे यांच्यातील संघर्ष उफाळला आहे. तवडकर आणि गावडे यांच्‍यात नेहमीच छत्तीसचा आकडा राहिला आहे. या दोन्‍ही नेत्‍यांमधील संघर्षामुळे ‘उटा’ संघटनेतही दोन गट पडले.

यांच्यातील संघर्षाचा परिणाम आता गोवा सरकार आणि भाजप (BJP) पक्षाच्‍या कामकाजावर होऊ लागला आहे. गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Pramod Sawant) स्‍वत: या दोघा नेत्यांच्या संघर्षात हस्‍तक्षेप करणार असल्याचे सांगितले जात आहे. भाजपचे प्रदेशाध्‍यक्ष सदानंद शेट यांनी या दोघा नेत्यांना 'सबुरी'चा सल्‍ला दिला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

तवडकर आणि गावडे यांच्यातील वादाची ठिकणी

काही दिवसांपूर्वी रमेश तवडकर यांनी आपल्‍या ‘श्रमधाम’ योजनेचा प्रारंभ गोविंद गावडे यांच्‍या प्रियोळ मतदारसंघात केला. गावडे प्रियोळचे आमदार असून देखील त्यांना आमंत्रण न देता त्‍यांचे प्रतिस्‍पर्धी मगोपचे दीपक ढवळीकर यांना तवडकर यांनी मानाचे स्‍थान दिले. यामुळे गावडे यांनी तीव्र संताप व्यक्त केला.

असले प्रकार मुख्‍यमंत्री सावंत कसे खपवून घेतात? असा सवाल गावडे यांनी केला. सावंत यांच्‍या जागी मनोहर पर्रीकर असते तर, त्यांनी असे प्रकार कधीच खपवून घेतले नसते, असे गावडे यांनी म्हटले. यानंतर फोंडा येथे झालेल्‍या ‘प्रेरणा दिवस’ कार्यक्रमात मंत्री गोविंद गावडे यांनी, भाजप सरकारने एसटीच्‍या मागण्‍या पूर्ण केल्‍या नाहीत. आदिवासी समाजातील लोकांचा आतापर्यंत फक्‍त राजकारण आणि मतांसाठी वापर केला गेला, असाही आरोप केला.

यातच ‘मंत्रिपद मिळाल्‍यास आपण ते स्‍वीकारू', असे वक्‍तव्‍य रमेश तवडकर यांनी करताच गोविंद गावडे यांना मंत्रिपदावरून डच्‍चू देण्‍यात येईल, अशी चर्चा सुरू झाली आहे. या चर्चांनी गावडे आता संतापले आहेत. कुणाला कसले राजकारण करावयाचे ते करून द्यात. प्रशासनातील ढिलेपणामुळे आदिवासी समाजातील लोकांची कामे अडून राहत आहेत.

हे मला मान्य नाही आणि त्यामुळेच मी माझा उद्रेक जाहीरपणे व्यक्त केल्याचे गावडे यांनी म्हटले. या दिग्गज नेत्यांच्या वादावर भाजपमधील एसटी नेते सावर्डेचे आमदार गणेश गावकर यांनी यावर मला या वादात पडायचे नाही. मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून तोडगा काढणे गरजेचे आहे, असे सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT