Swati Maliwal Assault Case : स्वाती मालीवाल रडल्या; कोर्टाकडून विभव कुमार यांना दणका

Bibhav Kumar Bail Plea : मालीवाल यांना कथित मारहाणप्रकरणी दिल्ली पोलिसांनी विभव कुमार यांना अटक केली आहे. त्यांच्या जामीन याचिकेवर आज सुनावणी झाली.
Bibhav Kumar, Swati Maliwal
Bibhav Kumar, Swati MaliwalSarkarnama
Published on
Updated on

New Delhi Political News : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे खासगी सचिव विभव कुमार यांना दिल्लीतील कोर्टाने दणका दिला आहे. आम आदमी पक्षाच्या राज्यसभेच्या खासदार स्वाती मालीवाल यांना मारहाणप्रकरणी (Swati Maliwal Assault Case) अटकेत असलेल्या विभव कुमार (Bibhav Kumar) यांचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळून लावला आहे. या सुनावणीदरम्यान मालीवाल यांना कोर्टातच रडू कोसळलं होतं.

मालीवाल यांना केजरीवालांच्या (Delhi CM Arvind Kejriwal) घरात मारहाण केल्याप्रकरणी विभव कुमार यांच्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) प्राथमिक चौकशीनंतर त्यांना अटकही केली आहे. याविरोधात कुमार यांनी दिल्लीतील तीस हजारी कोर्टात धाव घेत जामीन अर्ज दाखल केला होता. पण हा अर्ज कोर्टाने फेटाळला आहे. (Swati Maliwal Assault Case update)

Bibhav Kumar, Swati Maliwal
Rahul Gandhi News : राहुल गांधी येताच स्टेज कोसळला; मीसा भारतींनी दिला हात...

कोर्टात झालेल्या सुनावणीदरम्यान कुमार यांच्या वकिलांनी सांगितले की, मालीवाल यांनी त्यादिवसी केजरीवालांच्या घरी येणार असल्याचे कळवले नव्हते. त्यावेळी विभव कुमार मुख्यमंत्र्याच्या घरी नव्हते. मुख्यमंत्र्यांनी आपल्याला बोलावल्याचे मालीवाल यांनी म्हटलेले नाही. मुख्यमंत्र्यांच्या घरी परवानगीशिवाय असे कुणीही येऊ शकते का?, असा सवाल वकिलांनी उपस्थित केला. (Bibhav Kumar Bail Plea)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मालीवाल यांनी जाणीवपूर्वक मुख्यमंत्र्यांच्या घरातील ड्रॉईंग रूम हे ठिकाण निवडले. तिथे सीसीटीव्ही नसल्याने नंतर आरोप करणे शक्य होईल, हे त्यांना माहिती होते, असे आरोपही वकिलांनी केले. यावेळी मालीवाल कोर्टात हजर होत्या. वकिलांकडून विभव कुमार यांची बाजू मांडली जात असल्याने त्यांना रडू कोसळलं. (Latest Marathi News)

मालीवाल यांची बाजू मांडताना सरकारी पक्षाच्या वतीने सांगण्यात आले की, मुख्यमंत्र्याच्या ज्या घरामध्ये ही घटना घडली तिथे रजिस्टर नाही. स्वाती यांनी परवानगीशिवाय प्रवेश केला होतात तर शंभर क्रमांकावर फोन का करण्यात आला नाही? सुरक्षारक्षकांनीच त्यांना आतमध्ये नेले, असे वकिलांनी सांगितले.

दोन्ही बाजूकडील म्हणणे ऐकून घेतल्यानंर कोर्टाने विभव कुमार यांची जामीन याचिका फेटाळून लावली आहे. त्यामुळे त्यांना तुरुंगातच राहावे लागणार आहे. सद्या ते दिल्ली पोलिसांच्या ताब्यात आहेत. याप्रकरणी पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या घरातील सीसीटीव्ही फुटेजही ताब्यात घेतले आहे. तसेच येथील कर्मचाऱ्यांचीही चौकशी केली आहे. केजरीवालांच्या आई-वडिलांची गरज भासल्यास चौकशी केली जाईल, असेही दिल्ली पोलिसांनी म्हटले आहे.

Bibhav Kumar, Swati Maliwal
Gujarat High Court : आता गुजरात सरकारवर आमचा विश्वास नाही! कोर्टात ‘हाय’होल्टेज सुनावणी…

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com