M K STALIN  Sarkarnama
देश

MLA Senthil Balaji: स्टॅलिन सरकारला धक्का; राज्यपालांनी मंत्र्यांची केली थेट मंत्रिमंडळातून हकालपट्टी

सरकारनामा ब्यूरो

Tamilnadu : तामिळनाडूचे राज्यपाल आर.एन.रवी यांनी स्टॅलिन सरकारला मोठा झटका दिला आहे. आमदार व्ही.सेंथिल बालाजी यांची राज्यपालांनी मंत्रिमंडळातून थेट हकालपट्टी केली आहे. त्यामुळे स्टॅलिन सरकारसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. आमदार व्ही.सेंथिल बालाजी यांच्यावर काही दिवसांपूर्वीच ईडीने कारवाई केली होती. ईडीच्या कारवाईनंतर आमदार व्ही.सेंथिल हे सध्या तुरुंगात आहेत.

आमदार व्ही.सेंथिल बालाजी यांची स्टॅलिन सरकारच्या मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात आल्यानंतर या कारवाईबद्दल राजभवन कार्यालयाने माहिती दिली आहे. या कारवाईमुळे तामिळनाडूत राजकारण तापलं असून यावर आता स्टॅलिन सरकार काय भूमिका घेतं, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राजभवनाने नेमकी काय स्पष्टीकरण दिलं?

आमदार व्ही.सेंथिल बालाजी यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केल्यानंतर राजभवन कार्यालयातून याची माहिती देण्यात आली आहे. यासंदर्भात प्रेस नोट जारी करण्यात आली. यामध्ये सेंथील बालाजी यांची तात्काळ हकालपट्टी करण्यात येत असल्याचं म्हटलं आहे. तसेच तुरुंगवास भोगावा लागल्यामुळे बालाजी हे जर मंत्रिमंडळात कायम राहिले तर त्याचा कायद्याच्या योग्य प्रक्रियेवर विपरित परिणाम होईल, असं स्पष्टीकरण राजभवनाकडून देण्यात आलं आहे.

१४ जूनला ईडीकडून अटक

आमदार व्ही.सेंथिल बालाजी यांच्यावर ईडीने कारवाई केली होती. १४ जूनला ईडीने सेंथिल बालाजी यांच्यावर पीएमएलए कायद्यांतर्गत कारवाई केली करत त्यांना अटक केली होती. त्यानंतर न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यांची तब्येत ठिक नसल्याच्या कारणास्तव सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र, नोकऱ्यांसाठी लाच घेणे यासह मनी लाँडरिंग प्रकरणी व्ही सेंथिल बालाजी यांची ईडीकडून चौकशी सुरु आहे.

Edited By : Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT