Pune News: पुणे शहरातील सहकारनगर परिसरातील झालेल्या वाहनांच्या तोडफोड प्रकरणाची पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी गंभीर दखल घेतली आहे. सहकारनगर परिसरातील झालेल्या वाहनांच्या तोडफोड प्रकरणाच्या गुन्ह्यांची तक्रार गांभीर्याने न घेतल्याने दोन पोलीस निरीक्षकांसह तब्बल सात जणांना गुरवारी निलंबित करण्यात आलं आहे.
वाहनांच्या तोडफोड प्रकरणाच्या राड्यानंतर पोलीस आयुक्त रितेश कुमार अॅक्शन मोडवर आले आहेत. पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी दोन दिवसांत दोन पोलीस निरीक्षकांसह तब्बल दहाजण निलंबित केले आहेत. त्यामुळे पुणे पोलिसांच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढी मोठी कारवाई करण्यात आली आहे.
दोन पोलीस निरीक्षकांसह पोलीस कर्मचाऱ्यांनी कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत ही कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये सहकारनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगावकर, पोलीस निरीक्षक मनोज एकनाथ शेंडगे, सहायक निरीक्षक समीर विठ्ठल शेंडे, पोलीस उपनिरीक्षक हसन मकबूल मुलाणी, पोलीस उपनिरीक्षक मारुती गोविंद वाघमारे, पोलीस हवालदार विनायक दत्तात्रेय जांभळे यांना निलंबित करण्यात आले आहे.
दरम्यान, सदाशिव पेठेतील पेरूगेट पोलीस चौकीचे तीन पोलीस कर्मचारी निलंबित केल्यानंतर पोलीस आयुक्तांनी आज आणखी सात जणांवर निलंबनाची कारवाई केली. आपल्या कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी गेल्या दोन दिवसांत दहाजणांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
Edited By : Ganesh Thombare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.