AI-171 accident investigation ongoing : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या विमान अपघातात झालेल्या निधनावर साशंकता व्यक्त करत हा घातपात असल्याचा दावा केला आहे. त्यावरून महाराष्ट्रात आता उलटसुलट प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. दुसरीकडे आज मागील वर्षी अहमदाबाद येथे झालेल्या विमान अपघाताबाबत करण्यात आलेल्या घातपाताच्या दाव्यावरून खळबळ उडाली आहे.
मागील वर्षी जुलै अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघातप्रकरणी थेट पायलटवर संशय व्यक्त करण्यात आला आहे. Corriere Della Sera या इटालियन दैनिकाने याबाबतचे वृत्त दिले आहे. पायलटने जाणूनबुजून फ्युएल स्वीच बंद केल्याचा दावा या वृत्तामध्ये करण्यात आला आहे. या विमान अपघातात २६० जणांचा मृत्यू झाला होता. तर केवळ एकाच प्रवाशाचा जीव वाचला होता.
या दाव्यावर आता केंद्र सरकारकडून पहिली प्रतिक्रिया आली आहे. विमान अपघात तपास यंत्रणेने याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. AAIB ने म्हटले आहे की, मीडियामध्ये प्रसिध्द झालेल्या काही बातम्या केवळ अंदाजाच्या आधारे प्रसिध्द झाल्या आहेत. या अपघाताचा तपास अजूनही सुरू आहे. अशावेळी कोणतीही व्यक्ती किंवा कारणाला दोष देणे योग्य होणार नाही.
केवळ अधिकृत प्रतिक्रिया आणि अंतिम चौकशी अहवालाची वाट पाहा, असे आवाहन संस्थेने मीडिया आणि जनतेला केले आहे. तपास प्रक्रिया पारदर्शक आणि प्रोफेशनल पध्दतीने केली जात आहे. सध्यातरी अपघाताची पडताळणी सुरू असून संबंधित तथ्यांची खातरजमा केल्यानंतरच अधिकृत निष्कर्ष सार्वजनिक केले जातील, असेही संस्थेने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, तपासामध्ये मदत करणाऱ्या अमेरिकन तज्ज्ञांनी या निष्कर्षाला एक मोठे यश म्हटल्याचेही इटालियन वृत्तपत्राने वृत्तात म्हटले आहे. दोन पायलटमधील संवादाचाही संदर्भ देण्यात आला आहे. जुलै २०२५ मध्ये भारतीय एअरक्राफ्ट एक्सीडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्यूरोने जारी केलेल्या सुरूवातीच्या रिपोर्टमध्ये एका पायलटकडून फ्युएल कंट्रोल बंद करण्याबाबत शेवटच्या कॉकपीट संवादाचा हवाला देण्यात आला होता. कॉकपिट व्हाईस रेकॉर्डिंगमध्ये एका पायलटला तू (फ्युएल) का बंद केले?, असे बोलताना ऐकू येते. तर दुसऱ्याने ‘मी असे केले नाही,’ असे उत्तर दिल्याचेही ऐकू येते.
इटालियन वृत्तपत्राच्या दाव्यानुसार, तपास करणाऱ्यांनीही आता मान्य केले आहे की, दोन पायलटांपैकी एकाने इंजिन फ्युएल कंट्रोल स्वीच बंद करण्यात आला होता. त्यामुळे विमान बंद झाले आणि त्याचा अपघात झाला. दरम्यान, या विमानाचे पायलट इन कमांड कॅप्टन सुमीत सभरवाल आणि फर्स्ट ऑफिसर क्लाइव कुंदर हे को पायलट होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.