Government exam fee relief : पालकांसाठी महत्वाची बातमी; सरकारने परीक्षा फी केली माफ, ‘या’ विद्यार्थ्यांना होणार फायदा...

Flood affected talukas students : विद्यार्थ्यांना ही सवलत २०२५ ते २०२६ या शैक्षणिक वर्षासाठी लागू राहणार आहे. सरकारच्या या निर्णयाचा फायदा राज्यातील २८२ तालुक्यांतील विद्यार्थ्यांना होणार आहे.
Class 12 students entering examination center as district administration issues important exam instructions.
Class 12 students entering examination center as district administration issues important exam instructions. sarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Government : राज्यामध्ये मागील वर्षी अनेक भागात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली होती. त्यामुळे शेतकऱ्यांचे शेती पिक, शेतजमिनीचे मोठे नुकसान झाले होते. काही भागात पशुहानी, मनुष्यहानीही झाली होती. राज्यभरातील तब्बल २८२ तालुक्यांमध्ये अतिवृष्टीने हाहाकार उडविला होता. त्यावेळी सरकारने बाधित तालुक्यांसाठी अनेक सवलती जाहीर केल्या होत्या. आता सरकारने आणखी एक महत्वाच निर्णय घेतला आहे.

मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात सरकारने काढलेल्या शासन निर्णयानुसार बाधित तालुक्यातील शेतकऱ्यांना जमीन महसुलात सूट, सहकारी कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस एक वर्षासाठी स्थगिती, तिमाही वीज बिलात माफी, परीक्षा शुल्कात माफी व दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या फी माफीचा निर्णय घेतला होता.

राज्यातील उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत अकृषी विद्यापीठे, परीक्षा मंडळे व सर्व महाविद्यालयांची परीक्षा फी माफीची सवलत अद्याप जाहीर करण्यात आली नव्हती. अखेर सरकारने बुधवारी याबाबतचा जीआर काढला आहे. त्यानुसार उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत असलेली सर्व अकृषी विद्यापीठ व महाविद्यालयांतील बाधित क्षेत्रातील विद्यार्थ्यांना परीक्षा फी माफ करण्यात आली आहे.

Class 12 students entering examination center as district administration issues important exam instructions.
Satara ZP : साताऱ्यात राष्ट्रवादी-शिवसेनेकडून सत्तास्थापनेच्या हालचाली; भाजपकडून 'राजे कार्ड' खेळले जाणार? CM फडणवीस गेम फिरवणार!

विद्यार्थ्यांना ही सवलत २०२५ ते २०२६ या शैक्षणिक वर्षासाठी लागू राहणार आहे. सरकारच्या या निर्णयाचा फायदा राज्यातील २८२ तालुक्यांतील विद्यार्थ्यांना होणार आहे. या तालुक्यांमध्ये पुण्यातील हवेली आणि इंदापूर, नाशिकमधील कळवण, देवळा, इगतपुरी, मालेगाव, निफाड, नांदगाव, सटाणा, दिंडोरी, सुरगाणा, नाशिक, त्र्यंबकेश्वर, पेठ, सिन्नर, चांदवड व येवला तालुक्यांचा समावेळ आहे.

इतर जिल्ह्यांतील तालुक्या पुढील प्रमाणे –

पालघर – पालघर, डहाणू, तलासरी, विक्रमगड.

धुळे – धुळे, साक्री, सिंदखेडा.

जळगांव – एरंडोल, पारोळा, धरणगाव, पाचोरा, जामनेर, जळगाव, भडगाव, अमळनेर, रावेर, चाळीसगाव, भुसावळ, बोदवड, मुक्ताईनगर.

अहिल्यानगर – पारनेर, संगमनेर, अकोले, अहिल्यानगर, शेवगाव, कर्जत, पाथर्डी, नेवासा, राहाता, श्रीरामपूर, जामखेड, राहुरी, श्रीगोंदा, कोपरगाव.

सोलापूर – उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, बार्शी, अक्कलकोट, पंढरपूर, मोहोळ, मंगळवेढा, माळशिरस, माढा, करमाळा, सांगोला.

Class 12 students entering examination center as district administration issues important exam instructions.
ZP Election: मकरंदआबांचा गड पोखरत शिंदेंसेनेची कूच: राष्ट्रवादीला नडला ओव्हर कॉन्फिडन्स अन् निष्ठावंतांची जिरवाजिरवी

सांगली – कडेगाव, मिरज, वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव, कवठेमहाकाळ, विटा, आटपाडी, जत.

सातारा – सातारा, कराड, पाटण, फलटण, कोरेगाव, खटाव, माण.

कोल्हापूर – कागल, शिरोळ, पन्हाळा, करवीर, राधानगरी, गगनबावडा, आजरा, चंदगड.

छ. सभाजीनगर – छ. सभाजीनगर, कन्नड, सोयगाव, पैठण, वैजापूर, गंगापूर, खुलताबाद, सिल्लोड, फुलंब्री.

जालना – बदनापूर, घनसावंगी, अंबड, जालना, परतूर, मंठा, भोकरदन, जाफ्राबाद.

बीड – बीड, गेवराई, माजलगाव, केज, आंबेजोगाई, परळी, आष्टी, पाटोदा, शिरूर कासार, धारूर, वडवणी.  

लातूर – लातूर, औसा, रेणापूर, निलंगा, शिरूरअनंतपाळ, देवणी, उदगीर, जळकोट, अहमदपूर, चाकूर.

धाराशिव – धाराशिव, कळंब, भूम, वाशी, तुळजापूर, लोहारा, परांडा, उमरगा.

नांदेड – कंधार, किनवट, मुदखेड, भोकर, अर्धापूर, माहूर, नांदेड, लोहा, मुखड, देगलूर, बिलोली, धर्माबाद, नायगाव, हदगाव, हिमायतनगर, उमरी.

परभणी – पूर्णा, पालम, परभणी, सोनपेठ, जिंतूर, गंगाखेड, सेलू, मानवत, पाथरी.

हिंगोली – हिंगोली, औंढा नागनाथ, कळमनुरी, सेनगाव, वसमत.

बुलढाणा – नांदूरा, संग्रामपूर, चिखली, सिंदखेडराजा, देऊळगावराजा, लोणार, शेगाव, मोताळा, बुलढाणा, खामगाव, मेहकर, मलकापूर, जळगाव जामोद.

अमरावती – अमरावती, भातुकली, चांदूर रेल्वे, नांदगाव खंडेश्वर, धामणगाव रेल्वे, अचलपूर, अंजनगावसुर्जी, तिवसा, धारणी, चिखलदरा, वरुड, मोर्शी, चांदुरबाजार, दर्यापूर.

अकोला – अकोट, अकोला, पातूर, तेल्हारा, मुर्तीजापूर, बाळापूर, बार्शीटाकळी.

वाशिम – वाशीम, रिसोड, मालेगाव, मंगळूरपीर, कारंजा, मानोरा.

यवतमाळ – पुसद, यवतमाळ, बाभूळगाव, मारेगाव, महागाव, उमरखेड, कळंब, घाटंजी, राळेगाव, दारव्हा, आर्णी, नेर, दिग्रस, पांढरकवडा, वणी, झरी-जामणी.

वर्धा – वर्धा, सेलू, देवळी, आर्वी, समुद्रपूर, हिंगणघाट, कारंजा, आष्टी.

नागपूर – नागपूर, कामठी, सावनेर, पारशिवनी, मौदा, भिवापूर, कळमेश्वर, काटोल, रामटेक, हिंगणा, उमरेड, कही, नरखेड.

भंडारा – साकोली, भंडारा, मोहाडी, तुमसर, पवनी, लाखनी, लाखंदूर.

गोंदिया – तिरोडा, गोंदिया, गोरेगाव, मोरअर्जुनी, सालेकसा, सडक अर्जुनी, आमगाव, देवरी.

चंदपूर – चंद्रपूर, भद्रावती, राजूरा, बल्लारपूर, कोरपना, मूल, वरोरा, सावली, चिमूर, नागभिड, सिंदेवाही, पोंभुर्णा, जिवती, ब्रम्हपुरी.

गडचिरोली – चारमोशी, कोरची, गडचिरोली, धानोरा, मूलचेरा, आरमोरी, कुरखेडा, अहेरी, सिरोचा, भामरागड, एटापली, देसाइगंज (वडसा).

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com